Sharad Pawar News
Sharad Pawar News Esakal
महाराष्ट्र

Sharad Pawar: राष्ट्रवादीला धक्का! मोठा नेता ‘बीआरएस’कडून विधानसभेची निवडणूक लढविण्याची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते भगीरथ भालके हे तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीसाठी हैदराबादकडे रवाना झाले आहेत. केसीआर यांनी भालके यांच्यासाठी मंगळवारी सोलापूरमध्ये खास विमान पाठवले; परंतु तांत्रिक कारणामुळे ते पुण्याला लँड करण्यात आले. आज (बुधवारी) सकाळी भालके सहकुटुंब हैदराबादला रवाना झाले आहेत. भालकेंच्या राजकीय भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा दणका समजला जात आहे.

दरम्यान, भगीरथ भालके हे २०२४ मध्ये भारत राष्ट्र समितीकडून विधानसभेची निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राव यांच्या सोबतच्या या भेटीत काय काय ठरतं, यावर बरंच काही अवलंबून आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांना भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तथा तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कार्यालयातून पक्षप्रवेशासाठी संपर्क साधण्यात आला होता. मात्र, भालके यांनी आजपर्यंत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली होती. मात्र, आज ते चार्टर्ड विमानाने हैदराबादला रवाना झाल्याचे समजते.

अभिजित पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर त्यांना विधानसभा उमेदवारीबाबत संकेतही दिले होते. त्यामुळे राष्ट्रवादीतील भालके, कल्याणराव काळे आणि युवराज पाटील हे विठ्ठल परिवारातील नेतेमंडळी नाराज झाली आहेत. पवारांनी सोलापुरात बोलावून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आले नसल्याचे आजच्या घडामोडीवरून स्पष्ट झाले आहे.

विधानसभेच्या उमेदवारीसह पक्षाची आणखी काही जबाबदारी देण्याचा शब्दही राव यांच्याकडून देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. भालके यांना बीआरएसमध्ये सामील करून घेण्याची जबाबदारी मुख्यमंत्री राव यांनी त्यांची कन्या आणि निकटवर्तीय आमदारावर सोपवली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे.

दरम्यान, भालके यांनी पंढरपूर विधानसभेची निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी भगीरथ भालके यांच्याशी संपर्क साधून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता भालके यांचा निर्णय झाल्याचे स्पष्ट होते.

बीआरएसला ‘बी टीम’ म्हणणारे ‘सी टीम’ होतील

पंढरपूर येथील राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके हे देखील केसीआर यांना भेटणार आहेत. यानंतर पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे उमेदवार भालके असतील, असा विश्वासही धोंडगे यांनी व्यक्त केला. बीआरएस पक्ष हा महाराष्ट्रात भाजपची बी टीम म्हणून काम करेल, अशी टीका झाली होती. या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर देताना, आज बीआरएसला बी टीम म्हणणारे २०२४ च्या निवडणुकीत सी टीम होतील, असा टोलाही धोंडगे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला.

आजी-माजी दहा आमदार बीआरएसच्या संपर्कात

राज्यातील १० ते १२ आजी- माजी आमदार भारत राष्ट्र समितीच्या संपर्कात असल्याचा दावा महाराष्ट्रातील बीआरएस पक्षाचे नेते केशव धोंडगे यांनी पंढरपुरात केला. महाराष्ट्रापेक्षा तेलंगणा राज्य प्रगतिपथावर आहे. तेथील शेतकऱ्यांना अनेक सवलती दिल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक आजी- माजी आमदार आमच्या संपर्कात आहेत.

येत्या विधानसभा निवडणुकीत २८८ जागा लढवण्याचा निर्धार केला आहे. विधानसभा निवडणुकीत वेगळा चमत्कार दिसून येईल. यातील काही माजी आमदार व नेते आज बीआरएसचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना भेटणार आहेत. यामध्ये विदर्भ- मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचा समावेश आहे. याबाबत केसीआर यांनी आपणास फोनवर कळवले असल्याची माहिती केशव धोंडगे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi News: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस अलर्ट, सर्च ऑपरेशन सुरु

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

IPL 2024 MI vs LGS : मुंबईचा ‘प्लेऑफ’चा मार्ग खडतर ; लखनौचा विजय,स्टॉयनिसची चमक

Share Market Holiday: आज महाराष्ट्र दिनानिमित्त शेअर बाजार बंद राहणार का? पाहा सुट्ट्यांची यादी

"लग्न म्हणजे केवळ नाच-गाणी नाही.. आवश्यक विधींशिवाय झालेला हिंदू विवाह अमान्य"; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT