Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: शरद पवारांना आणखी एक मोठा धक्का! बड्या नेत्याची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला मोठा धक्का

अंकिता खाणे (Ankita Khane)

धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे, माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपप्रदेश अध्यक्ष अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीला पुनश्च हरिओम म्हणत राम राम ठोकला आहे.

पक्षाच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा सोपविला असून सध्यातरी कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचे अनिल गोटे यांनी स्पष्ट केले आहे.

धुळ्यात पत्रकार परिषद घेऊन गोटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गोटे यांची गेल्या काही काळापासून पक्षांतर्गत असलेल्या गटबाजीमुळे त्यांची घुसमट होत होती. यापूर्वी देखील गोटे यांनी वेळोवेळी पक्षश्रेष्ठींच्या जाहीर कार्यक्रमात देखील पक्षांतर्गत होत असलेल्या गटबाजी बाबत उघड उघड नाराजी व्यक्त केली होती, आणि त्यामुळेच पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडत असल्याचे ते म्हणालेत.

गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. याबाबत पक्षप्रमुख शरद पवार यांना देखील याबाबतची कल्पना दिली असल्याचे गोटे यांनी स्पष्ट केले आहे.

अजित पवार यांच्यासह इतर नेत्यांनी शिवसेना-भाजपला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीत फूट पडली आहे. आमदारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. पक्ष सावरण्यासाठी शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. एकीकडे शरद पवार गटाचा पक्ष सावरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. धुळ्यातील एका बड्या नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला वेग; पुणे विभागातील चार जिल्ह्यांत ६२०० हेक्टर जमीन संपादित होणार

Satish Jarkiholi ED Raid : मंत्री सतीश जारकीहोळींसह कन्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या घरांवर ईडीची छापेमारी; १८ ठिकाणी धाड

प्रणालीचं नाव घेताच कल्ला, आपल्याला कुणीही विचारत नाही, भडकली जान्हवी किल्लेकर; व्हायरल व्हिडिओवर किरण माने म्हणाले-

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Satara Crime: मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा AI मॉर्फ केलेला फोटो पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा; तीन फेसबुक अकाउंटधारकांसह यूट्यूब चॅनेलवर कारवाई

SCROLL FOR NEXT