Uddhav Thackrey Esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackrey: ठाकरेंना धक्का! शिवसेनेचा राम म्हणून ओळख असलेल्या माजी जिल्हाप्रमुखांचा अखेर ‘जय महाराष्ट्र’

यासंबधीचे पत्र गावडेंनी उध्दव ठाकरेंना पाठविले आहे

सकाळ डिजिटल टीम

तब्बल ३० वर्षे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरेसुद्धा ज्यांना ’शिवसेनेचा राम’ म्हणत होते, तेच शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राम गावडे यांनी अखेर शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र गावडे यांनी उध्दव ठाकरेंना पाठविले आहे.

गावडे यांच्यासोबत त्यांचे समर्थक, गावोगावचे सरपंच-उपसरपंच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईत येत्या 5 तारखेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे.

खेड तालुक्यातील धानेारे येथील शाखा प्रमुखपदापासून राम गावडे यांनी 1991 पासून आपल्या राजकीय कारर्किदीस सुरुवात केली. पक्ष संघटनेतील बहुतेक सर्वच पदांवर काम करुन 2014 पासून तब्बल सहा वर्षे जिल्हाप्रमुख असलेले राम सदाशिव गावडे हे येत्या 5 तारखेला भाजपत प्रवेश करीत आहेत. याबाबतची माहिती खुद्द गावडे यांनी दिली आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे राज्याच्या सर्वोच्च स्थानी बसूनही सामान्य शिवसैनिकांसह जिल्ह्यातील विकासासाठी काहीच दिले गेले नाही. सतत अवमानाची वागणूक आणि वारंवार बैठका- चर्चा करुनही अंमलबजावणीच होत नसल्याने खेड-आळंदी विधानसभा मतदार संघ तसेच शिरुर लोकसभा मतदार संघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना न्याय देण्यासाठी आपण भाजपत प्रवेश करीत आहोत.

ठाकरे गटातील सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त होत असल्याचे पत्र उध्दव ठाकरे यांना ३१ मार्च रोजी पाठविल्याची माहिती गावडे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Police: मुंबईत २९ दिवस ड्रोन आणि कंदील उडवण्यावर बंदी; दिवाळीपूर्वी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर!

RBI ECL Rule: आरबीआयच्या नवीन नियमांमुळे खासगी बँकांचे कर्ज महागणार? कोणत्या बँकांवर होणार परिणाम?

French PM Resigns: फ्रान्सची राजकीय अस्थिरता शिगेला! मंत्रिमंडळ नेमलं, पण पंतप्रधानांचा काही तासांत राजीनामा

Vijay Wadettiwar: ''काँग्रेसला मराठा समाजाने नाही तर...'', जरांगेंना उत्तर देताना वडेट्टीवारांचं मोठं विधान

Pune Traffic Police : मोशीत वाहतूक पोलिसाला मारहाण करणारे दोघे अटकेत; सिग्नल तोडल्याचे छायाचित्र काढल्याने वाद

SCROLL FOR NEXT