sakal solapur
महाराष्ट्र बातम्या

मोठी ब्रेकिंग! कोंबड्यातील ‘बर्ड फ्लू’ शोधण्यासाठी घेतले ७४ नमुने! सोलापुरात कावळे, बगळे, घारीचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’नेच; अंडी, चिकन भरपूर शिजवून खाण्याचा सल्ला

सोलापूर परिसरातील वन्यपक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण झाली असून, कोंबड्यांसह पाळीव पक्ष्यांमध्ये याची लागण झाली आहे का? याची तातडीने तपासणी करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने आज कोंबड्या आणि कबुतरांचे ७४ नमुने घेतले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : सोलापुरातील छत्रपती संभाजी तलाव परिसर, किल्ला बाग परिसरात कावळे, घार आणि बगळ्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’ने झाल्याचे भोपाळ येथील हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीज लॅबोरेटरीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. सोलापूर परिसरातील वन्यपक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण झाली असून, कोंबड्यांसह पाळीव पक्ष्यांमध्ये याची लागण झाली आहे का? याची तातडीने तपासणी करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने आज कोंबड्या आणि कबुतरांचे ७४ नमुने घेतले आहेत.

बर्ड फ्लूमुळे सोलापुरात २८ कावळे, दोन बगळे व चार घारींचा मृत्यू झाल्याचा अहवाल १३ मार्च रोजी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. या अहवालानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमान्वये उपाययोजनांचा आदेश काढला. या आदेशानुसार पशुसंवर्धन विभागाने आज छत्रपती संभाजी तलाव, किल्ला बाग परिसरात सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करून हा परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणांच्या एक ते दहा किलोमीटर परिसरातील ३२ कोंबड्या आणि पाच कबुतरांची समावेश आहे. कोंबड्या आणि कबुतरांच्या नाकपुड्यातील स्त्रावांचे ३७ तर विष्ठेचे ३७ असे एकूण ७४ नमुने घेतले आहेत.

...तर कोंबड्यांची वाहतूक व कत्तलीवर कठोर निर्बंध

सध्या सोलापुरात कावळे, बगळे, घार या वन्यपक्षांमध्ये बर्ड फ्लू आढळला आहे. कोंबड्यांसह पाळीव पक्षांमधील बर्ड फ्लूच्या शोधासाठी आज नमुने घेतले आहेत. कोंबड्यांमध्ये हा आजार आढळल्यास त्या दृष्टीने कोंबड्यांची वाहतूक व कोंबड्याची कत्तल यावर कठोर निर्बंध आणले जातील.

- डॉ. भास्कर पराडे-पाटील, सहायक आयुक्त, जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालय, सोलापूर

कोंबड्यातील ६७५ नमुने निगेटिव्ह

सोलापूर जिल्ह्यात सध्या साधारण २५ ते ३० लाख कोंबड्या आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वर्षभरातून तीन ते चार वेळा ‘बर्ड फ्लू’ संदर्भात नमुने घेतले जातात. एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत जिल्ह्यातून ६७५ नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीज लॅबोरेटरीला पाठविले होते. हे सर्व नमुने निगेटिव्ह आले आहेत.

अंडी, चिकन भरपूर शिजवूनच खा

बर्ड फ्लू आल्याने चिकन व अंडी प्रेमींमध्ये भितीचे वातावरण होऊ शकते. चिकन व अंडी पूर्णपणे उकडून घ्यावे. कच्ची अंडी पिण्याचे टाळावे. सोलापूर शहरासह ग्रामीण भागात वन्यपक्षी, कोंबड्यांसह पाळीव पक्षांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्यास तत्काळ पशुसंवर्धन विभागाला कळवावे, असे आवाहनही डॉ. पराडे-पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT