solapur suside

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

मोठी ब्रेकिंग! सोलापुरातील ‘पनाश’च्या १७ व्या मजल्यावरुन उडी मारुन मुलतानी बेकरीच्या मालकाची आत्महत्या; काही क्षण विचार केला, नंतर झोपले अन्‌...

विजयपूर रोडवरील पनाश अपार्टमेंटच्या १७ व्या मजल्यावरुन उडी मारुन मुलतानी बेकरी व फ्लोअर मिलचे मालक सुनील मोतीलाल सदारंगानी (वय ५९) यांनी गुरुवारी (ता. ५) दुपारी चारच्या सुमारास आत्महत्या केली. याची नोंद विजापूर नाका पोलिसांत झाली आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : विजयपूर रोडवरील पनाश अपार्टमेंटच्या १७ व्या मजल्यावरुन उडी मारुन मुलतानी बेकरी व फ्लोअर मिलचे मालक सुनील मोतीलाल सदारंगानी (वय ५९) यांनी गुरुवारी (ता. ५) दुपारी चारच्या सुमारास आत्महत्या केली. याची नोंद विजापूर नाका पोलिसांत झाली आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

सुनील सदारंगानी हे चार-पाच दिवसांपूर्वी पत्नीसोबत सोलापुरात आले होते. आता ते सोलापुरातच स्थायिक होणार होते. राजकुमार राठी यांचे ते जावई होते. त्यांना दोन मुले असून एक मुलगा अमेरिकेत व दुसरा पुण्यात व्यवसाय करतो. अमेरिकेतील मुलगा सोलापूरला यायला निघाला आहे. सदारंगानी यांच्यावर उद्या (शुक्रवारी) सायंकाळी पाच वाजता मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. खराडी (पुणे) येथे राहणाऱ्या त्यांच्या मुलास घटनेची माहिती कळविण्यात आली. रात्री उशिरा ते सोलापुरात दाखल झाले होते.

आकस्मित मयत म्हणून विजापूर नाका पोलिसांत नोंद झाली आहे. नातेवाईकांच्या फिर्यादीनंतर सदारंगानी यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. विजयपूर रोडवरील पनाश अपार्टमेंटचे १० मजले पूर्ण झाले असून, सात मजले अर्धवट स्थितीत आहेत. गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सदारंगानी यांनी गाडी पनाश अपार्टमेंटच्या उघड्या गेटमधून आत नेली. गाडी तेथे थांबवून ते अपार्टमेंटच्या शेवटच्या मजल्यावर चढले. आत्महत्येसाठी त्यांनी ‘पनाश’ अपार्टमेंटच का निवडले, हे गुलदस्त्यातच आहे.

हात जोडून विचार केला अन्‌...

सदारंगानी हे पनाश अपार्टमेंटच्या छतावर चढले. काही क्षण हात जोडून विचार केला. तेथेच आडवे झाले. आणि दीड-दोन मिनिटांनी झोपलेल्या स्थितीतच १७ व्या मजल्यावरुन ते स्वत: खाली कलंडले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

जिल्ह्यात सुप्रसिद्ध बेकरी, बड्या लोकांसोबत संबंध...

ऐकेकाळी सोलापूर शहर-जिल्ह्यातील प्रत्येकाच्या तोंडात मुलतानी बेकरीचेच नाव होते. त्यावेळी सुनील सदारंगानी यांचे बसणे-उठणे बड्या लोकांसोबत होते. पण, काही वर्षांपूर्वी बेकरी बंद पडली होती आणि ते पुण्यातील खराडीला राहायला गेले. काही वर्षांपासून ते आर्थिक अडचणींचा सामना करीत होते. त्यांच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचारही सुरु होते, असे सदारंगानी यांच्या नातेवाईकांनी, मित्रांनी व पोलिसांना सांगितले.

चारचाकीच्या नंबरवरून नातेवाईकाशी संपर्क

सुनील सदारंगानी हे स्वत:च्या चारचाकीतून पनाश अपार्टमेंटमध्ये गेले होते. आत्महत्येची बाब समजातच विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी सदारंगानी यांची चारचाकी तेथे उभी होती. गाडीच्या नंबरप्लेटवरुन सदारंगानी यांच्या नातेवाईकांशी पोलिसांनी संपर्क साधला. त्यांचा मेव्हणा काही वेळात त्याठिकाणी आला होता. पोलिसांनी रुग्णवाहिकेतून मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलला पाठविला. त्यांचा जागेवरच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : तोंडावर हात ठेवून बोलला, रेफरीने करेक्ट 'कार्यक्रम' केला; Miguel Almiron सोबत विचित्र घडलं... Video Viral

Telegram Ban नंतर ॲक्सेससाठी लोकांनी शोधल्या नव्या पद्धती; रॉकेटच्या वेगाने वाढले VPN डाऊनलोड, कसं वापरायचं पाहा?

Latest Marathi Live Updates: SIR कडे दुर्लक्ष करू नका- राज ठाकरे

FDA Action: तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडवर, राज्यभरात धडाका; बालरोगतज्ज्ञाच्या रुग्णालयावर एफडीएची कारवाई, औषधसाठा जप्त

Operation Tiger: ठाकरेंचे खासदार फोडणारा मास्टरमाईंड कोण? समोर आलं मोठं नाव; थेट दिल्ली कनेक्शन, आधी 'शस्त्र विक्रेता' म्हणूनही चर्चेत

SCROLL FOR NEXT