10th-12th exam sakal
महाराष्ट्र बातम्या

बोर्डाचा मोठा निर्णय! कॉपी रोखण्यासाठी आता ग्रामीणऐवजी शहरांमध्येच सर्वाधिक परीक्षा केंद्रे; बोर्डाची पथके तपासणार प्रत्येक केंद्रांवरील सुविधा, वाचा...

आता पुरेशा सुविधा असलेल्या आणि किमान ५०० विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था असलेल्या शाळांमध्येच दहावी-बारावीच्या परीक्षेचे केंद्र असणार आहे. शक्यतो, तालुक्याच्या ठिकाणीच शहरी भागात सर्वाधिक केंद्रे असतील, असा निर्णय बोर्डाने घेतला असून त्यावर पुढील आठवड्यात बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे, केंद्रांवर बैठे पथके, भरारी पथके नेमूनही परीक्षेत ३०० हून अधिक कॉपीचे गैरप्रकार आढळले. ग्रामीणमधील सर्वाधिक केंद्रांवर असे गैरप्रकार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता पुरेशा सुविधा असलेल्या आणि किमान ५०० विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था असलेल्या शाळांमध्येच दहावी-बारावीच्या परीक्षेचे केंद्र असणार आहे. शक्यतो, तालुक्याच्या ठिकाणीच शहरी भागात सर्वाधिक केंद्रे असतील, असा निर्णय बोर्डाने घेतला असून त्यावर पुढील आठवड्यात बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे राज्यात नऊ विभाग आहेत. त्यात पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण असे विभाग आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी ठोस प्रयत्न करुनही इयत्ता बारावीच्या परीक्षेत कोकण वगळता उर्वरित आठ विभागांमध्ये २३७ कॉपी केसेस झाल्या आहेत. दहावीच्या परीक्षेतही ७४ केंद्रांवर गैरप्रकार आढळले.

अमरावती, पुणे, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर विभागात सर्वाधिक गैरप्रकार झाले. आता कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाने ठोस उपाययोजना करण्याचे ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागातील बरीच केंद्रे बंद केली जाणार आहेत. सध्या ग्रामीणमध्ये ४० टक्के तर शहरी भागात ६० टक्के परीक्षा केंद्रे आहेत. सध्या २५० विद्यार्थ्यांसाठी केंद्र आहे, पण आता ५०० विद्यार्थ्यांसाठी एक केंद्र असणार आहे.

बोर्डाकडूनच होणार प्रत्येक केंद्राची पडताळणी

परीक्षा सुरु होण्यापूर्वी दीड-दोन महिने आधी प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केंद्रांची पाहणी केली. तेथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का, पक्के वॉल कंपाऊंड आहे का, पिण्याच्या पाण्याची सोय आहे का, अशा सुविधांची पडताळणी करुन त्याचा अहवाल बोर्डाला पाठविण्यात आला. मात्र, प्रत्यक्षातील स्थिती वेगळीच होती हे परीक्षेतील गैरप्रकारानंतर समोर आले. या पार्श्वभूमीवर आता बोर्डाचे अधिकारीच राज्यातील साडेपाच हजार परीक्षा केंद्रांची पडताळणी करणार आहेत. सुविधा नसलेल्या केंद्रांची मान्यता रद्द केली जाणार आहे.

बोर्डाच्याच पथकांकडून होणार परीक्षा केंद्रांची तपासणी

शहरी भागात केंद्रे असल्यावर पोलिस बंदोबस्त तात्काळ उपलब्ध होतो. भरारी पथकांनाही समजपणे नियमित भेटी देता येतात. त्यामुळे कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाकडून आता ठोस उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यासंदर्भात बोर्डाच्या अध्यक्षांसमवेत सर्व विभागीय अध्यक्षांसह अन्य अधिकाऱ्यांची पुढील आठवड्यात बैठक होईल. किती केंद्रांवर सर्व सुविधा आहेत, याची पडताळणी आता बोर्डाचेच अधिकारी तथा पथके करतील.

- औदुंबर उकीरडे, विभागीय अध्यक्ष, पुणे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

यंदा परीक्षेतील गैरप्रकार असे...

  • इयत्ता दहावी

  • ७४

  • इयत्ता बारावी

  • २३७

  • सामुहिक गैरप्रकार

  • एकूण गैरप्रकार

  • ३१८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT