महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadanvis: धनंजय मुंडेंच्या भेटीआधीच फडणवीसांचा जपानमधून मास्टरस्ट्रोक! कांदा प्रश्नी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

अंकिता खाणे (Ankita Khane)

कांदा निर्यात शुल्क वाढीवरून शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला आहे. कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, हमीभाव द्यावा अशी मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे. त्याचबरोबर राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे आज पियुष यांची भेट घेऊन त्यांच्याशी कांद्याप्रश्नी चर्चा करत आहेत. कांदा निर्यात शुल्क वाढीवरून दिल्लीत होणार बैठक सुरू आहे. अशातच कांदा प्रश्नावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत दिली आहे.

महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केल्याची माहिती आहे. तर केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा केली आहे. ₹2410 प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येईल. या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पीयूष गोयल आणि कृषी धनंजय मंत्री मुंडे भेटण्याच्या आधीच देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न सोडवण्यात आला आहे. निर्यात बंदी नव्हती तेंव्हा (4 दिवसांपूर्वी) 2200 रुपयांच्या आसपास दर होता. आता 200 रुपये अतिरिक्त दर वाढवला आहे.

दरम्यान कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि पियूष गोयल यांच्या बैठकी आधीच जपानमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय दिला. कृषी मंत्री मुंडे दिल्लीत बैठक होण्याआधीच फडणवीस यांनी कांदा प्रश्नावर तोडगा काढला काढल्यामुळे जपानमधून ही महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढाकार घेत राष्ट्रवादी वर सरशी केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT