mantralay sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्य सरकारचा मोठा निर्णय; विवाहासाठी ‘या’ जोडप्यांना मिळणार आता अडीच लाख रुपये; काय आहेत अटी, कागदपत्रे कोणती लागणार, अर्ज कोठे करायचा? वाचा...

दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी, दिव्यांग आत्मनिर्भर बनावा, विवाहापासून दिव्यांग वंचित राहू नये, यासाठी आता दिव्यांगांना विवाहासाठी शासनाकडून अडीच लाख रुपये दिले जाणार आहेत. त्यात पती-पत्नीपैकी एकजण दिव्यांग असल्यास त्यांना दीड लाख रुपये तर दोघेही दिव्यांग असल्यास अडीच लाख रुपये मिळणार आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी, दिव्यांग आत्मनिर्भर बनावा, विवाहापासून दिव्यांग वंचित राहू नये, यासाठी आता दिव्यांगांना विवाहासाठी शासनाकडून अडीच लाख रुपये दिले जाणार आहेत. त्यात पती-पत्नीपैकी एकजण दिव्यांग असल्यास त्यांना दीड लाख रुपये तर दोघेही दिव्यांग असल्यास अडीच लाख रुपये मिळणार आहेत.

दिव्यांग व्यक्तीच्या कुटुंबाकडून दिव्यांग व्यक्तीच्या विवाहाचा सहज स्वीकार, त्यामुळे त्यांना प्राप्त होणारे कौटुंबिक, भावनिक, मानसिक, सामाजिक स्थैर्य विचारात घेऊन दिव्यांगांच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने दिव्यांग- अव्यंग विवाह प्रोत्साहन अनुदान योजना सुरू केली आहे. दिव्यांगांना समाजात स्वतंत्रपणे राहता यावे, त्यांना राहणीमानाचा दर्जा मिळावा, त्यांच्या अधिकारांचे रक्षण व्हावे यासाठी ही योजना आहे. दरम्यान, आता विवाहाचा खर्च वाढल्याने दिव्यांग कल्याण विभागाने अनुदानात वाढ केली आहे.

पूर्वी दिव्यांगांना विवाहासाठी ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जात होते; आता त्यात मोठी वाढ करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार, आता पती किंवा पत्नी यापैकी एक दिव्यांग असल्यास त्यांना विवाहासाठी दीड लाख रुपये आणि पती-पत्नी दोघेही दिव्यांग असल्यास त्यांना अडीच लाख रुपये मिळणार आहेत. त्यातील अर्धी रक्कम पती-पत्नीच्या संयुक्त बॅंक खात्यात पाच वर्षांसाठी फिक्स डिपॉझिट केली जाईल. उर्वरित रक्कम त्यांना लगेचच संसाराच्या कामासाठी वापरता येणार आहे.

कागदपत्रे अन्‌ अटी काय?

  • वधू किंवा वराकडे किमान ४० टक्के दिव्यांगत्वाचे आधार संलग्न वैध वैश्विक ओळखपत्र (यूडीआयडी) आवश्यक

  • दिव्यांग वधू-वरापैकी एकजण महाराष्ट्राचा रहिवासी असावा, विवाह कायदेशीररीत्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदलेला असावा

  • वधू व वराचा पहिलाच विवाह असावा, वधू किंवा वर घटस्फोटित असल्यास अशी मदत यापूर्वी घेतलेली नसावी

  • विवाहानंतर एक वर्षात योजनेच्या लाभासाठी अर्ज करता येईल. लाभासाठी ‘यूडीआयडी’ दिव्यांग प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, आधार कार्ड, संयुक्त बॅंक खात्याचे बॅंक पासबुक, अधिवास प्रमाणपत्र आवश्यक

जिल्हा निवड समितीकडून मान्यता मिळाल्यावर अनुदान

नवविवाहित दिव्यांग लाभार्थीने आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयाकडे अर्ज करावा. कार्यालयाकडून अर्जाची छाननी करून पात्र लाभार्थींचे प्रस्ताव जिल्हा निवड समितीकडे मान्यतेसाठी पाठविले जातील. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, समाजकल्याण सहायक आयुक्त व दिव्यांग कल्याण अधिकाऱ्यांची समिती त्या प्रस्तावास मंजुरी देईल. त्यानंतर लाभार्थीच्या खात्यात लाभ जमा होईल.

- मनोज राऊत, दिव्यांग कल्याण अधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई लेन पूर्ण बंद, पुणे मार्गावर १२ किमी वाहनांच्या रांगा; उलटलेल्या टँकरमधून गॅस गळती वाढली

Pankaja Munde: बाबासाहेबांना अभिवादन नाही… अन् गाव आक्रमक! पंकजा मुंडेंना ग्रामस्थांनी रोखलं, VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक ठप्प, १२ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

Chhatrapati Sambhajinagar Politics: छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘एमआयएम’ची भाजपला धक्का देण्याची तयारी; राजकारणात सगळं शक्य, इम्तियाज जलील यांचा इशारा!

मुंबई एक्सप्रेसवे वाहतूक ठप्पच, पर्यायी मार्ग वापरा; प्रवासाला ४-५ तास जास्त लागू शकतात, ट्राफिक पोलिसांचे आवाहन

SCROLL FOR NEXT