nitin raut minister 
महाराष्ट्र बातम्या

वीज ग्राहकांसाठी मोठा निर्णय ! हप्त्याने भरता येणार बिल; महावितरणची 58 हजार कोटींची थकबाकी

तात्या लांडगे

सोलापूर : अनेकांच्या जीवनातील अंधार दूर केलेल्या महावितरणपुढेच वाढलेल्या थकबाकीमुळे काळोख पडला आहे. राज्यातील तब्बल एक कोटी 37 लाख 86 हजार ग्राहकांकडे सद्यस्थितीत तब्बल 58 हजार कोटींची थकबाकी झाली आहे. महावितरणच्या अडचणी दूर होऊन अखंडीत सेवेसाठी आता ग्राहकांना हप्त्याच्या स्वरुपात बिल भरण्याची सवलत देण्यात आली आहे. 


मागील आठ-दहा वर्षांपासून बहूतांश ग्राहक वीज वापरुनही बिल भरत नाहीत. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील तब्बल 29 लाख 67 हजार 581 ग्राहकांचा वीज पुरवठा कायमचा खंडीत करण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली. तर राज्यातील बहूतेक ग्रामपंचायती व सार्वजनिक पाणी पुरवठा संस्थांनीही वीज बिल भरलेले नाही. स्ट्रीट लाईटचेही बिल थकबाकीत गेले आहे. 57 लाख 27 हजार 381 घरगुती ग्राहक, सव्वापाच लाख व्यावसायिक तर पावणेदोन लाख उद्योजकांकडे वीजेची थकबाकी वाढली आहे. त्यामुळे थकबाकीच्या ओझ्याने महावितरणपुढील अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे ग्राहकांनी वापरलेल्या वीजेचे बिल नियमित भरायला हवे. तर दुसरीकडे चोरुन वीज वापरण्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश ऊर्जा मंत्री राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

बिलाची सक्‍तीने वसुली केलेली नाही
लॉकडाउन काळात कोणत्याही ग्राहकांकडून बिलाची सक्‍तीने वसुली केलेली नाही. आता प्रत्येकांना घरोघरी बिले पोहच केली असून त्यांनी थोडे-थोडे बिल भरावे. राज्यातील प्रत्येक ग्राहकांना हप्ते पाडून दिले जातील. महावितरणने लॉकडाउन काळात विनाखंडीत वीज पुरवठा केला असून यापुढेही विनाखंडीत सेवेसाठी ग्राहकांनी वेळेत बिल भरावे. 
- नितीन राऊत, ऊर्जा मंत्री 


महावितरणची राज्यातील थकबाकी 
निवासी : 1,344.95 कोटी 
व्यावसायिक : 980.54 कोटी 
औद्योगिक : 1,648.14 कोटी 
पॉवरलूम : 422.95 कोटी 
शेती : 38,010.73 कोटी 
सार्वजनिक पाणीपुरवठा संस्था : 1,813.82 कोटी 
स्ट्रीट लाईट : 4,504.83 कोटी 
कायमस्वरुपी वीज खंडीत केलेले ग्राहक : 8,686.71 कोटी 
इतर : 136.97 कोटी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT