वाळू ईसकाळ
महाराष्ट्र बातम्या

मोठा निर्णय! जप्त केलेली वाळू घरकूल लाभार्थींना मोफत मिळणार; नवीन वाळू धोरणाअभावी थांबले लिलाव; ६०० रुपये ब्रासची वाळू मिळालीच नाही

आता २०२३ ऐवजी वाळू धोरण रद्द करून २०२५चे सुधारित धोरण आणले जाणार आहे. तुर्तास, मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत बेघर लाभार्थींची घरे मुदतीत पूर्ण व्हावीत म्हणून घरकूल बांधकामासाठी प्रशासनाच्या कारवाईत जप्त वाळू त्यांना मोफत दिली जाणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सामान्यांना घर बांधकामासाठी ६०० रुपये ब्रास वाळू देण्याचे धोरण आणले, पण त्यानुसार कार्यवाही होऊ शकली नाही. आता २०२३ ऐवजी वाळू धोरण रद्द करून २०२५चे सुधारित धोरण आणले जाणार आहे. तुर्तास, मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत बेघर लाभार्थींची घरे मुदतीत पूर्ण व्हावीत म्हणून घरकूल बांधकामासाठी प्रशासनाच्या कारवाईत जप्त वाळू त्यांना मोफत दिली जाणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यातील २० लाख घरकुलांना नुकतीच मंजुरी देण्यात आली असून त्यातील १० लाख लाभार्थींना १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता देखील वितरित झाला आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील ६२ हजार बेघर लाभार्थी आहेत. ज्यावेळी सहाशे रुपये ब्रास वाळूचे धोरण जाहीर झाले, त्यावेळी जिल्हा ग्रामीण यंत्रेणेने सुमारे ६० हजार ब्रास वाळूची मागणी केली होती. मात्र, एकाही लाभार्थीस त्या दराने वाळू मिळाली नाही. त्यामुळे हजारो घरकुलांची कामे सुरूच झाली नाहीत.

सध्याचा घरकूल बांधकामाचा खर्च पहाता दीड लाखाच्या अनुदानात घरकूल पूर्ण होऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवर आता बेघर लाभार्थींना घरकूल बांधकामासाठी प्रशासनाने कारवाईत जप्त केलेली वाळू मोफत दिली जाणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडून जप्त वाळू साठ्यांची माहिती मागविली आहे. तहसीलदार आता मंडलाधिकारी, तलाठ्यांमार्फत माहिती संकलित करीत आहेत.

घरकूल लाभार्थींना मोफत वाळू देण्याचे नियोजन

सुधारित वाळू धोरण निश्चित झाल्यावर त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे, तत्पूर्वी प्रशासनाच्या कारवाईत जप्त केलेल्या वाळूची माहिती तहसीलदारांकडून मागविली आहे. माहिती प्राप्त झाल्यानंतर घरकूल लाभार्थींसाठी ती वाळू मोफत उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

- अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी, सोलापूर

घरकूल लाभार्थींना यादीनुसार मिळणार वाळू

जिल्ह्यात जप्त केलेला वाळू साठा नेमका कोणत्या तालुक्यात किती आहे, त्यानुसार प्रत्येक गटविकास अधिकाऱ्यांकडून (बीडीओ) त्यांच्या तालुक्यातील घरकूल लाभार्थींची यादी घेतली जाईल. त्यानुसार त्यांच्या घरकूल बांधकामासाठी किती वाळू लागेल, तेवढी वाळू त्यांना दिली जाईल. संबंधित ठिकाणची वाळू त्या लाभार्थींनी स्वत: न्यायची असून त्या ठिकाणी महसूलचा अधिकारी नेमला जाणार आहे.

तेरा ठिकाणी पावणेदोन लाख ब्रास वाळू

खानापूर, कुडल, देवीकवठे (ता. अक्कलकोट), मिरी-ताडारे (मोहोळ-मंगळवेढा), बाळगी, भंडारकवठे, लवंगी (ता. दक्षिण सोलापूर), माळेगाव, आलेगाव खु, टाकळे टे, गारअकोले (ता. माढा), आव्हे, नांदोरे (ता. पंढरपूर) या १३ ठिकाणी सद्यःस्थितीत लिलाव होऊ शकते अशी एक लाख ७७ हजार ८६० ब्रास वाळू आहे. त्या वाळूच्या लिलावासंदर्भात जिल्हा प्रशासनाने शासनाकडे मार्गदर्शन मागविले असून प्रशासनाला नवीन वाळू धोरणांची प्रतीक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT