solapur city police sakal
महाराष्ट्र बातम्या

चोरी-घरफोडी रोखण्यासाठी मोठा निर्णय! नागरिकांनी मागणी केल्यावर सुरू होणार त्या भागात पोलिसांची गस्त; सोलापुरात दरमहा सरासरी 49 चोऱ्या तर दररोज 1 वाहन चोरीला

सोलापूर शहरातून दररोज एक वाहन विशेषत: दुचाकी चोरीला जाते तर दरमहा शहरात ४९ चोऱ्या होतात, असे सव्वावर्षातील प्रमाण आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्युआर कोड पेट्रोलिंग सुरू करण्यात आले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरातून दररोज एक वाहन विशेषत: दुचाकी चोरीला जाते तर दरमहा शहरात ४९ चोऱ्या होतात, असे सव्वावर्षातील प्रमाण आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्युआर कोड पेट्रोलिंग सुरू करण्यात आले आहे. सध्या शहरातील ५५९ ठिकाणी पोलिस नियमित गस्त घालतातच, याशिवाय ज्या ठिकाणी पोलिसांची गस्त आवश्यक आहे, त्याठिकाणच्या नागरिकांनी मागणी केल्यास तेथेही रात्रगस्त सुरू केली जाणार आहे.

विविध गुन्ह्यातील फरार आरोपी, पोलिसांनी तडीपार केलेले आरोपी, सोलापूर शहरातील सर्व धार्मिक स्थळे, शाळा-महाविद्यालये, मोठमोठ्या बॅंका, व्यापारी पेठा, अशा ठिकाणी क्युआर कोड लावण्यात आले आहेत. दररोज २४ तासात तीनवेळा पोलिस त्याठिकाणी भेटी देतात आणि तो क्युआर कोड स्वत:च्या मोबाईलमध्ये स्कॅन करतात. पण, ज्याठिकाणी पोलिसांची गस्त नाही तेथेच चोरी, घरफोडीचे प्रमाण जास्त आढळते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता तेथील नागरिकांसाठी पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

शहरातील ज्या भागातील नागरिकांना असुरक्षित वाटते, चोरी, घरफोडी यापूर्वी झाल्या आहेत अशा ठिकाणी देखील संबंधितांच्या मागणीनुसार क्युआर कोड लावले जाणार आहेत. त्या परिसरातील नागरिकांनी स्थानिक पोलिसांकडे तशी मागणी केल्यास तेथील पोलिस निरीक्षक हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मान्यतेने त्या भागात क्युआर कोड लावू शकतात. त्यानंतर त्या भागात पोलिसांची नियमित गस्त सुरू होईल.

नागरिकांनीही खबरदारी घ्यावी, पोलिसांची गस्त सुरूच

घरफोडी आणि चोरी रोखण्यासाठी पोलिसांचे २४ तास प्रयत्न सुरूच आहेत. चोऱ्या उघडकीस करण्यात सोलापूर पोलिस राज्यात पाचव्या क्रमांकावर आहेत. शहराचा विस्तार, एकूण लोकसंख्या आणि पोलिसांचे मनुष्यबळ पाहता प्रत्येक ठिकाणी पोलिस पोचणे शक्य नाही. त्यामुळे गुन्हा होऊच नये, यासाठी नागरिकांनी देखील खबरदारी घ्यायला हवी. बाहेर जाताना शेजाऱ्यांना सांगणे, घरासमोर सीसीटीव्ही लावणे आवश्यक आहे.

- विजय कबाडे, पोलिस उपायुक्त, सोलापूर

शहरातील गस्तीचे चार टप्पे...

  • १) रात्रगस्त ११ ते पहाटे ५ पर्यंत

  • २) मॉर्निंग स्कॉड पहाटे पाच ते सकाळी दहापर्यंत

  • ३) दहानंतर बीट मार्शल पेट्रोलिंग, दामिनी पथकाचेही पेट्रोलिंग

  • ४) सायंकाळी पाच ते रात्री दहापर्यंत गुन्हे प्रकटीकरणाची गस्त

सव्वा वर्षात शहरातील चोरीचे प्रमाण

  • (जानेवारी ते डिसेंबर २०२४ पर्यंत)

  • वाहने चोरी

  • ३५१

  • एकूण चोरी-घरफोड्या

  • ५७८

  • (जानेवारी ते मार्च २०२५ पर्यंत)

  • वाहनांची चोरी

  • ९७

  • एकूण चोरी-घरफोडी

  • १५६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: आनंदाची बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे दहा पदरी होणार; चार नव्या लेनसाठी राज्य सरकारचं नियोजन काय?

Stock Market Closing : बाजारातील तेजी सलग सहाव्या दिवशीही कायम; निफ्टीने ओलांडला 26000 चा टप्पा; कोणते शेअर्स फायद्यात?

Viral Video: शिल्पा शेट्टीची 'बिबट्या साडी' पाहिलीत का? लाल साडीत हॉट अंदाज, अन् पदरावर भला मोठा बिबट्या

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

Mumbai News: जिथं भविष्याची स्वप्नं पाहिली त्याच शाळेने माझ्या मुलीचा जीव घेतला, चिमुकलीच्या आईचा मन हेलावणारा टाहो!

SCROLL FOR NEXT