Liquor Sakal
महाराष्ट्र बातम्या

Liquor : या जिल्ह्यात मद्यविक्रीत मोठी वाढ; राज्याला मिळाला दोन हजार कोटींचा महसूल

पुणे जिल्ह्यात २०२१-२२ या वर्षाच्या तुलनेत या गेल्या वर्षी (२०२२-२३) देशी मद्याच्या विक्रीत तब्बल १५ टक्के, विदेशी मद्यविक्रीत २३ टक्के आणि बिअर विक्रीत ५१ टक्के वाढ झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे जिल्ह्यात २०२१-२२ या वर्षाच्या तुलनेत या गेल्या वर्षी (२०२२-२३) देशी मद्याच्या विक्रीत तब्बल १५ टक्के, विदेशी मद्यविक्रीत २३ टक्के आणि बिअर विक्रीत ५१ टक्के वाढ झाली आहे.

पुणे - पुणे जिल्ह्यात २०२१-२२ या वर्षाच्या तुलनेत या गेल्या वर्षी (२०२२-२३) देशी मद्याच्या विक्रीत तब्बल १५ टक्के, विदेशी मद्यविक्रीत २३ टक्के आणि बिअर विक्रीत ५१ टक्के वाढ झाली आहे. याशिवाय वाइन विक्रीमध्ये ३१ टक्के इतकी वाढ झाली. राज्य उत्पादन शुल्क विभागाला सरत्या आर्थिक वर्षात मिळालेल्या महसूलावरून ही माहिती समोर आली आहे.

गेल्या आर्थिक वर्षात (२०२२-२३) २ हजार २२४.८२ कोटी रुपयांचा महसूल राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाला. अवैधरित्या गोवा राज्यातून उत्पादन शुल्क बुडवून महाराष्ट्रात वाहतूक केल्याप्रकरणी गेल्या वर्षभरात २१ गुन्हे दाखल करून ४२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये १९ वाहने जप्त करून आठ कोटी ६४ लाख ४५ हजार १६९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर अवैधरित्या ढाब्यांवर मद्य सेवन केल्याप्रकरणी १३४ प्रकरणांची नोंद करण्यात आली असून न्यायालयाकडून २९० आरोपींना दोषी ठरवून शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यांच्याकडून दंडापोटी ३ लाख ९६ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक सी. बी. राजपूत यांनी दिली.

महसूल (रुपयांत)

  • १,८५५.८२ कोटी - २०२१-२२

  • २,२२४.८२ कोटी - २०२२-२३

(आकडेवारी : राज्य उत्पादन शुल्क विभाग)

उत्पादन शुल्क पुणे विभाग (२०२२-२३ आकडेवारी)

  • २ हजार ६५८ - दाखल गुन्हे

  • २ हजार ९४७ - अटकेतील आरोपी

  • १८ कोटी १४ लाख १९ हजार १७७ - जप्त मुद्देमाल (रुपये)

तक्रारीसाठी संपर्क क्रमांक

अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक आणि विक्री यांबाबत यापुढेही नियमित कारवाई सुरू राहणार आहे. शहरासह जिल्ह्यात कोणत्याही नागरिकास अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्री याबाबत माहिती मिळाल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ आणि दूरध्वनी क्रमांक ०२०-२६०५८६३३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही राजपूत यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Protest: कांद्याला भाव नाही, शेतकरी आक्रमक! पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेतलं ताब्यात, चांदवडमध्ये रस्त्यावर रणकंदन

Kolhapur VIP Service: कोल्हापूरसह परराज्यातील तरुणींकडून व्हिआयपी सर्व्हिस, म्हैसाळमधील आलिशान बारवर छापा; नशेत धुंद तरुणांना घेतलं ताब्यात

Supreme Court Dowry Harassment Ruling : सासरच्यांनी सुनेला जुळवून घेण्यास सांगितल्यास गुन्हा दाखल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

Mumbai: तिसऱ्या मुंबईला ग्रीनफिल्डचा बुस्टर, नवी मुंबई ते पुणे नव्या एक्सप्रेसवेचा मोठा लाभ होणार; काय आहे प्रकल्प ?

Ichalkaranji IPL Betting : ऑनलाईन ‘आयपीएल’ सट्टेबाजी, झटपट पैशाचा नाद इचलकरंजीतील तरूणांचा कारनामा, ५८ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT