Ajit Pawar  
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : अजित पवारांच्या बातम्या कोणी पेरल्या? माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाराजी मागचं गणित

Sandip Kapde

महाराष्ट्राच्या राजकारणातील चर्चा आणि घडामोडींवरून अनेक अंदाज बांधल्या जात आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. अजित पवार पक्षप्रमुख शरद पवार यांच्याविरोधात बंड करून भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. या प्रकरणी द इंडियन एक्प्रेसमध्ये वृत्त देखील आहे. दरम्यान यावर काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.

महाराष्ट्रात भाजपकडून ऑपरेशन कमळ सुरू आहे. समजा राष्ट्रवादी काँग्रेसता ४० आमदारांचा गट बाहेर पडला तर ही मंडळी भाजपमध्ये जायाला तयार आहेत. ते लोक भाजपमध्ये विलिन होणार आहेत का?, कारण जोपर्यंत गट दुसऱ्या पक्षात विलिन होत नाही तोपर्यंत पक्षांतर बंदी कायद्याची तलावर त्यांच्यावर असेल. त्यांनी असं काही केल तर ते सरळ निलंबित होतील. ऑपरेशन लोटसची शक्यता मला जास्त वाटते, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आणि त्यांच्या कुटुंबावर मोठा दबाव आहे. कोल्हापूरला इडीच्या चौकश्या सुरू आहेत. एक राष्ट्रवादीचे मंत्री जेलमध्ये आहेत. त्यामुळे देखील बंडाची चर्चा होत असेल, असा अंदाज देखील चव्हाण यांनी वर्तवला

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सुप्रीम कोर्टाचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निकाल गेला तर फडणवीस आणि शिंदेंकडे १४९ आमदार राहतील. १६ आमदार निलंबित झाले तर सभागृहाची संख्या २८८ वरुन कमी होईल. पण त्याचा मध्यबिंदू १३६ कडे येईल. तर १४९ आमदार शिंदे-फडणवीसांकडे असतील तर त्यांना काही धोका नाही. मात्र पक्षांतर बंदी कायद्यात अडकायला नको म्हणू शिंदे गटातील उर्वरीत आमदार जर पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेले तर, अशी भीती भाजपला वाटत असेल.

बातमी कुणी पेरली? -

आमदारांनी दोन्ही दगडावर हात ठेवले आहेत. राष्ट्रवादीत अंतर्गत काय सुरू आहे. हे कुणाला माहित नाहीत. मात्र द इंडियन एक्प्रेसमध्ये बातमी दिल्याशिवाय येणार नाही. ही बातमी कुणी पेरली. या सुत्रधार कोण आहे. जी तीन लोक दिल्लीत जाऊन भाजप नेत्यांना भेटली. त्यांनी ह्या बातम्या पेरल्या का?, हे सांगता येत नाही, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT