mantralay sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत ६५ वर्षांवरील १५५३० आजीबाई अन्‌ २१ वर्षांखालील ३२८२ तरुणी; ९८ हजार महिलांची चुकली ‘ई-केवायसी’; अंगणवाडी सेविका पुन्हा घरोघरी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक लाभार्थीस ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक होते. घाईघाईत सोलापूर जिल्ह्यातील ९८ हजार २१ महिलांची ई-केवायसी चुकल्याची बाब समोर आली आहे. दुसरीकडे १९ हजार महिला वयोगटाच्या निकषात बसत नसतानाही लाभ घेत असल्याचेही शासनाच्या यादीतून स्पष्ट झाले आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक लाभार्थीस ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक होते. घाईघाईत सोलापूर जिल्ह्यातील ९८ हजार २१ महिलांची ई-केवायसी चुकल्याची बाब समोर आली आहे. दुसरीकडे १९ हजार महिला वयोगटाच्या निकषात बसत नसतानाही लाभ घेत असल्याचेही शासनाच्या यादीतून स्पष्ट झाले आहे. शासनाकडून आलेल्या यादीतील प्रत्येक लाभार्थींची आता पुन्हा एकदा अंगणवाडी सेविकांमार्फत फेरपडताळणी होणार आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी २१ ते ६५ वयोगटातील महिला, ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे तेच पात्र आहेत. तरीपण, सोलापूर जिल्ह्यातील १५ हजार ५३० लाडक्या बहिणींचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त आहे. तर २१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या तीन हजार २८२ तरुणी असल्याचे शासनाकडून आलेल्या यादीत नमूद आहे. तसेच महिला व पुरूषांची समान नावे असल्याने ७१७ लाभार्थींची देखील त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली जाणार असल्याचे जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले.

त्यासंदर्भात आज (मंगळवारी) अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यात कोणकोणत्या जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांचा पडताळणीस विरोध आहे, याचीही माहिती घेण्यात आली. सोलापूर शहर-जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका लाडकी बहीण योजनेतील त्या लाभार्थींची पडताळणी करतील, असेही श्री. मिरकले यांनी स्पष्ट केले.

सोलापूर जिल्ह्यातील पडताळणी

  • ई-केवायसी चुकली

  • ९८,०२१

  • ६५ वर्षांवरील महिला

  • १५,५३०

  • २१ वर्षांखालील मुली

  • ३,२८२

  • महिला-पुरुषांची समान नावे

  • ७१७

याद्या प्रकल्प अधिकाऱ्यांना पाठविल्या

राज्य शासनाकडून ई-केवायसी चुकलेल्या महिला लाभार्थींसह २१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या आणि ६५ वर्षांवरील महिलांची आणि पुरुष व महिलांची समान नावे असलेल्यांची तालुकानिहाय याद्या प्राप्त झाल्या आहेत. आता त्या सर्वांची जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी होणार आहे. त्यासाठी याद्या तालुक्यातील प्रकल्प अधिकाऱ्यांकडे पाठविल्या आहेत.

- प्रसाद मिरकले, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT