zp schools sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! ३५ हजार शिक्षकांचा कापला जाणार एक दिवसाचा पगार; आंदोलनावेळी बंद राहिल्या राज्यातील २४ हजार शाळा; आता ९ अन्‌ १२ तारखेला नागपूरमध्ये आंदोलन

राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ५ डिसेंबर रोजी शाळा बंद आंदोलन केले त्या शिक्षकांना एक दिवसाचा पगार (अंदाजे १० कोटी) मिळणार नाही. आंदोलनामुळे ‘प्राथमिक’च्या २१ हजार ४७७ तर ‘माध्यमिक’च्या दोन हजार ५३९ शाळा बंद राहिल्या होत्या.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ५ डिसेंबर रोजी शाळा बंद आंदोलन केले त्या शिक्षकांना एक दिवसाचा पगार (अंदाजे १० कोटी) मिळणार नाही. आंदोलनामुळे ‘प्राथमिक’च्या २१ हजार ४७७ तर ‘माध्यमिक’च्या दोन हजार ५३९ शाळा बंद राहिल्या होत्या. आंदोलनात दोन्ही शिक्षण विभागाकडील ३५ हजारांवर शिक्षक विनापरवाना सहभागी झाले होते.

‘टीईटी’च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करावी, १५ मार्च २०२५ रोजीच्या संचमान्यतेच्या शासन निर्णयात दुरुस्ती करावी या प्रमुख मागण्यांसाठी शिक्षकांनी ५ डिसेंबर रोजी आंदोलन केले. दरम्यान, आंदोलनावेळी पूर्ण शाळा बंद ठेवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणे गैर आहे, विनापरवाना आंदोलनात सहभागी होणे देखील चुकीचे आहे. शाळा बंद आंदोलनात प्राथमिक शाळांमधील ९१ हजार तर माध्यमिकचे ३० हजारांवर शिक्षक सहभागी झाले होते. पण, त्यात प्राथमिक शाळांमधील सुमारे २२ हजार तर माध्यमिक शाळांमधील १३ हजारांवर शिक्षक विनापरवाना सहभागी झाले होते.

परंतु, प्राथमिक शिक्षण विभागाच्या माहितीनुसार आंदोलनादिवशी ठाणे, नंदुरबार, जळगाव, धाराशिव, नांदेड, यवतमाळ, बुलढाणा, नागपूर, भंडारा, मुंबई महापालिका, कल्याण डोंबिवली, ठाणे, नवीन मुंबई, भिवंडी-निझामपूर, मिरा-भाईंदर, उल्हासनगर या महापालिकांच्या हद्दीतील एकही शाळा बंद नव्हती. पण, राज्यातील अन्य जिल्ह्यांमधील २१ हजार ४७७ शाळा त्या दिवशी पूर्णपणे बंद होत्या. त्यामुळे या शाळांमधील शिक्षकांवरही बिनपगाराची कारवाई होऊ शकते, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

२१ जिल्ह्यातील शिक्षकांनी पाळला नियम

सोलापूरसह पुणे, अहिल्यानगर, सांगली, रत्नागिरी, ठाणे, रायगड, पालघर, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, नांदेड, अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया या २१ जिल्ह्यातीलल माध्यमिक शाळांमधील एकही शिक्षक विनापरवाना आंदोलनात सहभागी झालेला नव्हता. आता ९ डिसेंबरला नागपूरमध्ये याच मागण्यांसाठी तर १२ डिसेंबरला जुन्याय पेन्शनसंदर्भात आंदोलने होणार आहेत. त्यात किती शिक्षक सहभागी होणार, त्या दिवशी किती शाळा बंद राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘त्या’ शिक्षकांवर होईल बिनपगारीची कारवाई

लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे, पण त्यासाठी परवानगी घ्यावी लागते. विनापरवाना शाळा बंद ठेवून आंदोलनात सहभागी झालेल्यांना त्या दिवसाचा पगार मिळणार नाही. शाळा सुरु ठेवून परवानगीने आंदोलनात सहभागी झालेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर काहीही कारवाई होणार नाही.

- डॉ. महेश पालकर, संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग, पुणे

विनावेतन होणारे ‘माध्यमिक’चे शिक्षक

  • विभाग शिक्षक

  • मुंबई ७५७

  • नाशिक २,६४१

  • कोल्हापूर ६,४०४

  • छ.संभाजी नगर १९६

  • अमरावती १,८९५

  • नागपूर १,३२३

  • एकूण १३,२१६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : नवले पुलावर अपघाताची मालिका थांबेना! पहाटे स्कूलबस कारला धडकली अन्...; Video समोर

Panchang 8 December 2025: आजच्या दिवशी गणेश सहस्त्रनाम स्तोत्र वाचावे व ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

IND vs SA T20I : भारत- द. आफ्रिका ट्वेंटी-२० मालिकेची उत्सुकता! जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक, संघ अन् महत्त्वाचे कुठे पाहाल 'फ्री' थेट प्रक्षेपण

भाजप आमदार करणार तुकाराम मुंढेंच्या निलंबनाची मागणी, नियमबाह्य काम केल्याचा आरोप

Indigo Flight Update : 'इंडिगो'चा माफिनामा, आजपासून विमानसेवा सुरळीत चालणार, कसं असेल वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT