mantralay sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! ‘या’ वैयक्तिक लाभाच्या योजनांमधील लाभार्थींची आधार पडताळणी सुरू; माहिती सादर करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत; मुदतीनंतर लाभ मिळणार नाही

लाभार्थींनी तत्काळ बँक पासबुक, आधार कार्ड, (आधार कार्ड व मोबाईल नंबर बँकेच्या खात्याला लिंक व अपलोड) मोबाईल नंबर (आधार कार्ड लिंक असलेले), शिधापत्रिका, अपंग प्रमाणपत्र, विधवा महिलेच्या बाबतीत पतीचा मृत्यू दाखला व इतर आवश्यक कागदपत्रे घेऊन ३१ जुलैपूर्वी तहसील कार्यालयांमधील संजय गांधी शाखांमध्ये जमा करायचे आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांचे अनुदान यापूर्वी बीम्स प्रणालीतून तहसील स्तरावरून बँकेत पाठवून लाभार्थींच्या खात्यावर वर्ग केले जात होते. आता महाराष्ट्र शासनाच्या नवीन धोरणानुसार डिसेंबर २०२४ पासून संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्यनिवृत्ती वेतन या योजनांमधील लाभार्थींचे अनुदान ‘डीबीटी’ प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जात आहे.

वैयक्तिक लाभाच्या योजनांमधील लाभार्थींची माहिती ३१ जुलैपूर्वी ‘डीबीटी’ प्रणालीवर भरण्याची कार्यवाही करावयाची आहे. या योजनांच्या लाभार्थींची माहिती ‘डीबीटी’ पोर्टलवर भरणे व त्यांचे आधार पडताळणी करण्याचे कामकाज सुरू आहे. बऱ्याच लाभार्थींनी हयात प्रमाणपत्र किंवा वैयक्तिक माहिती तहसील कार्यालयास सादर केलेली नाही, त्यामुळे त्यांना अनुदानाचा लाभ घेता आलेला नाही.

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेतील ज्या लाभार्थींनी अद्यापही पोर्टलवर माहिती अपलोड केलेली नाही, त्यांची यादी सर्व तहसील कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्या सर्व लाभार्थींनी मुदतीत सर्व माहिती पोर्टलवर अपलोड करायची आहे. जिल्ह्यातील सुमारे १० हजारांहून अधिक लाभार्थींनी डीबीटी पोर्टलवर माहिती भरलेली नाही. त्यांचा लाभ पुढे कायम सुरू ठेवण्यासाठी ही मुदत देण्यात आली आहे.

...तर अनुदान मिळणार नाही

लाभार्थींनी तत्काळ बँक पासबुक, आधार कार्ड, (आधार कार्ड व मोबाईल नंबर बँकेच्या खात्याला लिंक व अपलोड) मोबाईल नंबर (आधार कार्ड लिंक असलेले), शिधापत्रिका, अपंग प्रमाणपत्र, विधवा महिलेच्या बाबतीत पतीचा मृत्यू दाखला व इतर आवश्यक कागदपत्रे घेऊन ३१ जुलैपूर्वी तहसील कार्यालयांमधील संजय गांधी शाखांमध्ये जमा करायचे आहेत. मुदतीत कागदपत्रे सादर न करणाऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Farmer Loan Waiver : साताऱ्यातील 31,556 शेतकरी पात्र! अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर; तुमच्या गावातील यादी 'येथे' पाहा

Mumbai Crime: लोक भवनाच्या नावाखाली रेल्वे तिकीट घोटाळा! खोटे शिक्के अन् राज्यपालांची बनावट सही, सूत्रधारासह ३ रेल्वे एजंट अटकेत

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! फिटमेंट फॅक्टरवर सरकारने पहिल्यांदाच मांडली अधिकृत भूमिका; संसदेत काय सांगितले?

Latest Marathi News Live Update : पुढील चोवीस तासांत विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज

Prashant Kishor: "माझ्याच पोलीस ठाण्यात मला धमक्या, एकदा वर्दी काढली तर..."; SHO अन् प्रशांत किशोर यांच्यात वाद, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT