gas Cylinder

 
sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! व्यावसायिक गॅस सिलिंडरचे बुकिंग तात्पुरते बंद; घरगुती सिलिंडरसाठी २५ दिवस थांबावे लागणार; ‘या’ घटकांना नियमांत सूट, वाचा...

युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गॅस सिलिंडर वितरणाचे नियोजन अधिक कडक करण्यात आले आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचे बुकिंग तात्पुरते बंद करण्यात आले आहे. घरगुती सिलिंडर बुकिंगनंतरचा प्रतीक्षा कालावधी २५ दिवसांचा करण्यात आला आहे. नागरिकांनी अतिरिक्त साठवणूक करू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गॅस सिलिंडर वितरणाचे नियोजन अधिक कडक करण्यात आले आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचे बुकिंग तात्पुरते बंद करण्यात आले आहे. घरगुती सिलिंडर बुकिंगनंतरचा प्रतीक्षा कालावधी २५ दिवसांचा करण्यात आला आहे. नागरिकांनी अतिरिक्त साठवणूक करू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी केले आहे.

सोलापूर जिल्हा प्रशासनामार्फत मंगळवारी (ता. १०) गॅस कंपन्यांच्या समन्वय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन जिल्ह्यातील गॅस वितरण एजन्सीधारकांचा आढावा घेण्यात आला. सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागासह एकूण ९४ गॅस एजन्सी कार्यरत आहेत. त्यामध्ये बीपीसीएलच्या ५४, एचपीसीएलच्या २० आणि आयओसीएलच्या २० एजन्सी आहेत. बैठकीत आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस वितरण नियमांमध्ये काही बदल करण्यात आल्याची माहिती समन्वय अधिकाऱ्यांनी दिली.

त्यानुसार व्यावसायिक वापरासाठी देण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरचे बुकिंग पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. मात्र शासकीय संस्था, रुग्णालये, एनटीपीसी आणि अन्नछत्र मंडळांना या नियमातून सूट देण्यात आली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरबाबत पुढील निर्णय उच्चस्तरीय चर्चेनंतर घेण्यात येणार आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे वितरण करताना ग्राहकांना कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या ओटीपीची पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच ई-केवायसी प्रक्रियाही करण्यात येणार आहे, जेणेकरून सिलिंडरचा गैरवापर होऊ नये. जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून गॅस वितरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका स्तरावर दक्षता पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही पथके गॅस एजन्सींची तपासणी करून सिलिंडरची दैनंदिन आवक-जावक तपासणार आहेत तसेच काळाबाजार रोखण्यासाठी उपाययोजना करणार आहेत.

दररोजची गरज २६० मेट्रिक टन

सोलापूर जिल्ह्यात फेब्रुवारी २०२६ अखेरपर्यंत ११ लाख ८८ हजार २५८ घरगुती गॅस ग्राहक असून १० हजार ८०० व्यावसायिक ग्राहक आहेत. जिल्ह्याची घरगुती गॅसची दैनंदिन गरज सुमारे २५० मेट्रिक टन, तर व्यावसायिक गॅसची गरज १० मेट्रिक टन इतकी आहे.

‘हे’ आहेत गॅस वितरणातील प्रमुख बदल....

  • व्यावसायिक गॅस सिलिंडरचे बुकिंग तात्पुरते बंद

  • घरगुती सिलिंडर बुकिंगनंतर २५ दिवस प्रतीक्षा

  • वितरणावेळी ओटीपी पडताळणी अनिवार्य

  • ई-केवायसी प्रक्रिया राबविणार

  • काळाबाजार रोखण्यासाठी तालुका स्तरावर दक्षता पथके

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Cylinder Shortage : हॉटेल व्यावसायिक गॅसवर! व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा मर्यादीत, पाइपलाइन गॅसचा ८० टक्केच वापर करण्याची सूचना

Porsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला जामीन मंजूर

Latest Marathi News Update : राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Disabled Scheme: तब्बल ३० वर्षांनंतर मोठा बदल! महायुती सरकारने दिव्यांगांसाठी आर्थिक मदत ₹१५,००० पर्यंत वाढवली; अर्ज कसा करायचा?

Women Employees: महिला कर्मचाऱ्यांसाठी गेम-चेंजर निर्णय! ‘लवकर या-लवकर जा’ योजना जाहीर; लाभ कसा घेता येणार?

SCROLL FOR NEXT