Land Partition Measurement

 

esakal

महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! ७/१२ उताऱ्यावरील पोटहिश्शाची मोजणी आता २०० रुपयांत; ‘या’ वेबसाईटवर करा ऑनलाईन अर्ज, ९० दिवसांत होईल मोजणी

सातबारा उताऱ्यावरील एकाच कुटुंबातील व्यक्तींना आता आपापल्या पोटहिश्शाची मोजणी अवघ्या २०० रुपयांत करून मिळणार आहे. अर्जदारास नियमित मोजणीच्या निकषांप्रमाणे ९० दिवसांत त्याच्या क्षेत्राची मोजणी करून हद्दी निश्चित करून दिल्या जाणार आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सातबारा उताऱ्यावरील एकाच कुटुंबातील व्यक्तींना आता आपापल्या पोटहिश्शाची मोजणी अवघ्या २०० रुपयांत करून मिळणार आहे. अर्जदारास नियमित मोजणीच्या निकषांप्रमाणे ९० दिवसांत त्याच्या क्षेत्राची मोजणी करून हद्दी निश्चित करून दिल्या जाणार आहेत.

जमीन-जागांचे दर सध्या लाखांमध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर रक्तनात्यातदेखील जागा-जमिनीवरून वाद होत आहेत. बांध पोखरणे, अतिक्रमण अशा बाबींवरून टोकाचे वाद होत आहेत. त्यातून सोलापूरच्या भूमिअभिलेख कार्यालयाकडे दररोज सरासरी २०० हून अधिक शेतकरी क्षेत्र मोजणीसाठी अर्ज करत आहेत. अनेकजण मोजणीसाठी पोलिसांची मदत घेत आहेत.

या पार्श्वभूमीवर राज्याच्या महसूल विभागाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत सातबारा उताऱ्यावरील एकाच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला त्याचा पोटहिश्शा अवघ्या दोनशे रुपयांत मोजून मिळणार आहे. परंतु, भूमिअभिलेख कार्यालयाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने मोजणीसाठी काही विलंब लागू शकतो. शासनाच्या या निर्णयानुसार ऑनलाइन अर्ज केलेल्यांना नियमित मोजणीच्या निकषांनुसार तीन महिन्यांत त्यांच्या क्षेत्राची मोजणी करून मिळेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, करमाळा, मोहोळ, माळशिरस तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी पोटहिश्शाच्या मोजणीसाठी अर्ज केले आहेत.

पोटहिस्सा म्हणजे नेमकं काय?

सातबारा उताऱ्यावरील एकूण क्षेत्राची कुटुंबातील सदस्यांमध्ये समान किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात वाटणी झालेली असते. प्रत्येक सदस्याच्या नावापुढे त्याच्या क्षेत्राची नोंद असते. मात्र, एकाच कुटुंबातील रक्तनात्यातील व्यक्तींच्या नावे वेगवेगळी क्षेत्रे नोंदलेली असतात, तरी त्यांचा सातबारा उतारा एकच असतो. उताऱ्यात क्षेत्र, वहिवाट वेगवेगळी असते; पण त्यात कोणाचे क्षेत्र कोणत्या दिशेला आहे व त्या क्षेत्राची हद्द कुठून कुठपर्यंत आहे, याची नोंद नसते. यातूनच भविष्यात वाद उद्भवतात. त्यामुळेच हे वाद कमी करण्यासाठी महसूल विभागाने २०० रुपयांत त्या पोटहिश्शांची मोजणी करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

९० दिवसांत होईल मोजणी

महसूल विभागाच्या निर्णयानुसार सातबारा उताऱ्यावरील एकाच कुटुंबातील व्यक्तींच्या नावावरील क्षेत्राची मोजणी (पोटहिस्सा) अवघ्या २०० रुपयांत होणार आहे. त्यासाठी संबंधित क्षेत्रधारकास ‘भूमिअभिलेख’च्या ऑनलाइन संकेतस्थळावर अर्ज करावा लागेल. त्यानंतर ९० दिवसांत त्या पोटहिश्शाची मोजणी करून दिली जाते.

- दादासाहेब घोडके, अधीक्षक, भूमिअभिलेख, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाणी समजून टरपेंटाईन पिलं, दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; नागपूरमधील घटना

Gadchiroli News: उघड्यावर असलेले धान उचलणार कधी?; दुर्लक्षामुळे धान्याची नासाडी; दोन लाख ३८ हजार ५४९ क्विंटल धानाची उचल नाहीच

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

Global Economy: युद्धामुळे इंधन, खतांचे दर दीर्घकाळ चढेच राहणार; IMF आणि जागतिक बँकेचा इशारा!

IPL, CSK vs KKR: अजिंक्य रहाणे दुहेरी कात्रीत सापडला; आधी कोलकाताने मॅच हरली, नंतर BCCI ने कारवाई केली; नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT