zp schools sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! कमी पटाच्या झेडपी शाळांवर कंत्राटी शिक्षक; ७० वर्षांपर्यंतच्या सेवानिवृत्त शिक्षकांची २० हजार रुपयांच्या मानधनावर होईल नेमणूक

जिल्हा परिषदांच्या ज्या शाळांचा पट १० व २० पेक्षा कमी आहे, त्या शाळांवर आता कंत्राटी शिक्षक नेमले जाणार आहेत. १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाप्रमाणे ही कार्यवाही होईल. सेवानिवृत्त शिक्षकास, ज्यांचे वय ७० वर्षांपर्यंत आहे त्यांची त्या शाळांवर नेमणूक केली जाणार आहे. त्यासाठी त्यांना दरमहा २० हजार रुपयांचे मानधन दिले जाणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्हा परिषदांच्या ज्या शाळांचा पट १० व २० पेक्षा कमी आहे, त्या शाळांवर आता कंत्राटी शिक्षक नेमले जाणार आहेत. १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाप्रमाणे ही कार्यवाही होईल. सेवानिवृत्त शिक्षकास, ज्यांचे वय ७० वर्षांपर्यंत आहे त्यांची त्या शाळांवर नेमणूक केली जाणार आहे. त्यासाठी त्यांना दरमहा २० हजार रुपयांचे मानधन दिले जाणार आहे.

२०२३-२४ च्या शैक्षणिक वर्षात राज्यातील जिल्हा परिषदांच्या १८ हजार ६०० शाळांची पटसंख्या १ ते २० पर्यंत होती. पण, २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील संचमान्यतेनुसार २० पेक्षा कमी पटाच्या शाळांची संख्या २५ हजारांपर्यंत पोचली. आता १५ मार्च २०२४ च्या संचमान्यतेच्या शासन निर्णयानुसार १० पेक्षा कमी पटाच्या शाळेवर प्रत्येकी एक नियमित तर २० पेक्षा कमी पटाच्या शाळांवर प्रत्येकी दोन नियमित शिक्षक अपेक्षित आहेत. मात्र, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करूनही नियमित शिक्षक कमी पडल्यास त्या ठिकाणी कंत्राटी शिक्षक नेमला जाणार आहे.

दरम्यान, सध्या जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये चार हजारांपर्यंत शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्या ठिकाणी देखील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होणार आहे. डीएड, बीएड झालेल्या तरुणांऐवजी आता कंत्राटी शिक्षक म्हणून सेवानिवृत्त शिक्षकांचीच निवड करावी, असे शासनाचे आदेश आहेत.

शासनाच्या आदेशानुसार होईल कार्यवाही

शालेय शिक्षण विभागाने १५ मार्च २०२४ रोजी संचमान्यतेचा शासन निर्णय काढला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या १० व २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर कंत्राटी शिक्षक घेतले जाणार आहेत. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता डिसेंबरअखेर पूर्ण होईल. त्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व कंत्राटी शिक्षकांच्या नेमणुकीची कार्यवाही शासनाच्या आदेशानुसार केली जाईल.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

जिल्हा परिषद शाळांची स्थिती

  • एकूण अंदाजे शाळा

  • ६३,०००

  • शिक्षकांची रिक्त पदे

  • ४,३००

  • १० पेक्षा कमी पटाच्या शाळा

  • ८,०००

  • २० पेक्षा कमी पटाच्या शाळा

  • १७,०००

कंत्राटी शिक्षकांना दरवर्षी ८४ कोटी

आदिवासी तथा पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदांच्या शाळांवर अद्याप नियमित शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे त्या क्षेत्रातील शाळांवर सध्या ३५०० कंत्राटी शिक्षक नेमलेले आहेत. त्यांच्यासाठी दरमहा सात कोटी म्हणजेच वर्षाला ८४ कोटी रुपयांचे मानधन दिले जात असल्याचे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT