mantralay sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! लाडक्या बहिणींच्या ‘E-kyc’ला निवडणुका होईपर्यंत मुदतवाढ? उद्या संपणार 2 महिन्यांची मुदत; 1 कोटींवर महिलांनी अजूनही केली नाही ‘ई-केवायसी’

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक लाभार्थीस ‘ई-केवायसी’ करावी लागणार आहे. त्याची दोन महिन्यांची मुदत १८ नोव्हेंबरला संपणार आहे. पण, अजूनही राज्यातील सुमारे एक कोटी १० लाख महिलांची ‘ई-केवायसी’ राहिली आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरु असल्याने त्यांची नाराजी सरकारला परवडणारी नाही. त्यामुळे निवडणुका होईपर्यंत ‘ई-केवायसी’स मुदतवाढ मिळेल.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक लाभार्थीस ‘ई-केवायसी’ करावी लागणार आहे. त्याची दोन महिन्यांची मुदत १८ नोव्हेंबरला संपणार आहे. पण, अजूनही राज्यातील सुमारे एक कोटी १० लाख महिलांची ‘ई-केवायसी’ राहिली आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरु असल्याने त्यांची नाराजी सरकारला परवडणारी नाही. त्यामुळे आता निवडणुका होईपर्यंत ‘ई-केवायसी’स मुदतवाढ मिळेल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली. शासनाच्या मुदतीत योजनेअंतर्गत राज्यातील दोन कोटी ५९ लाख महिलांनी अर्ज केले. त्यांना १ जुलैपासून लाभ देण्यात आला. पण, योजनेच्या निकषांनुसार पडताळणी झाल्यावर चारचाकी वाहने, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला, वय कमी-अधिक, शासकीय नोकरदार महिला, पुरुष लाभार्थी, केंद्र व राज्य सरकारच्या दुसऱ्या वैयक्तिक योजनांचे लाभार्थी, असे सुमारे ५० लाख लाभार्थी कमी झाले आहेत.

आता ई-केवायसी केल्यानंतर वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असलेल्या लाभार्थींचा लाभ बंद होणार आहे. या चिंतेत अनेक महिलांनी ई-केवायसी अजूनपर्यंत केली नाही. दुसरीकडे काहींच्या आधारकार्डला लिंक असलेला मोबाईल क्रमांक सध्या अस्तित्वात नसल्याने त्यांना पहिल्यांदा ‘आधार’ला मोबाईललिंक करावा लागणार आहे. तसेच ज्या महिला लाभार्थीस पती, वडील नाही, त्यांचीही ई-केवायसी राहिली आहे. त्यामुळे या प्रक्रियेसाठी मुदत मिळणार हे निश्चित आहे.

लाडक्या बहिणींची स्थिती

  • सुरवातीचे लाभार्थी

  • २.५९ कोटी

  • दरमहा मिळणारा लाभ

  • ३,८८५ कोटी

  • सध्याचे अंदाजे लाभार्थी

  • २.०९ कोटी

  • ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिला

  • १.१० कोटी

  • ‘ई-केवायसी’साठी मुदत

  • १८ नोव्हेंबरपर्यंत

मुदतवाढीची वाट न पहाता सर्वांनी करावी ई-केवायसी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या प्रत्येक लाभार्थीस आता ‘ई-केवायसी’ करावी लागणार आहे. शासनाने दिलेली ‘ई-केवायसी’ची दोन महिन्यांची मुदत १८ नोव्हेंबरला संपणार आहे. अजून निम्मे लाभार्थी ‘ई-केवायसी’ करायचे बाकी आहेत. त्या प्रक्रियेसाठी मुदतवाढीची शक्यता आहे. पण, सर्व लाभार्थींनी त्यांचा लाभ पुढे कायमचा सुरु राहण्यासाठी मुदतीत ‘ई-केवायसी’ करून घ्यावी.

- दीपक ढेपे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सोलापूर

नव्या लाभार्थींना अजूनही नाही संधी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार २१ ते ६५ वर्षांपर्यंतच्या महिला योजनेसाठी पात्र आहे. त्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे, अशीही अट आहे. त्यानुसार आता ज्यांचे वय २१ झाले आहे, अशा लाखो मुली राज्यात आहेत. पण, नव्या लाभार्थींना योजनेत सहभागी होता येत नाही. त्यामुळे ही योजना कायमची सुरु राहील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मक्का मदिनाजवळ भीषण अपघात! ४२ भारतीयांचा होरपळून मृत्यू; डिझेल टँकरला बस धडकली अन्...

आता प्रादेशिक सैन्यातही महिलांना संधी मिळणार, भारतीय लष्कराचा प्रायोगिक तत्वावर विचार

Dombivli Politics: टिळकनगरमध्ये मतदारांचा वेगळा कौल; 'स्थानिकच नगरसेवक हवा, उपरा नकोच'!

Latest Marathi Breaking News : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी जाणार

Stock Market Today : शेअर बाजाची हिरव्या रंगात सुरुवात; सेन्सेक्स 240 अंकांनी वाढला; तर निफ्टी बँकने उच्चांक गाठला!

SCROLL FOR NEXT