skills devlopment subjects Sakal
महाराष्ट्र बातम्या

कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! नोकरी, रोजगारासाठी शिकवले जाणार कौशल्याचे ‘हे’ विषय; विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल विज्ञान शाखेकडेच

कला शाखेकडील विद्यार्थ्यांचा कल २०१०-११ नंतर कमी झाला आणि तेव्हापासून विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती विज्ञान व वाणिज्य शाखेलाच राहिली आहे. या पार्श्वभूमीवर आता कला शाखेच्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर कोडिंग, होम-सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, नर्सरी गार्डनिंग, टायपिंग असे कोर्स तथा विषय असणार आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : कला शाखेकडील विद्यार्थ्यांचा कल २०१०-११ नंतर कमी झाला आणि तेव्हापासून विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती विज्ञान व वाणिज्य शाखेलाच राहिली आहे. त्यामुळे राज्यातील कला शाखेच्या कनिष्ठ महाविद्यालयांना घरघर लागली. या पार्श्वभूमीवर आता कला शाखेच्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर कोडिंग, होम-सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, नर्सरी गार्डनिंग, टायपिंग असे कोर्स तथा विषय असणार आहेत. त्यानुसार २०२६-२७ पासून अंमलबजावणी करण्याचे नियोजन सुरू आहे.

राज्यात साडेनऊ हजार कनिष्ठ महाविद्यालये असून त्यातील आठ हजार महाविद्यालयांमध्ये कला शाखेच्या तुकड्या आहेत. राज्यात कला शाखेसाठी सहा लाख ७२ हजार ७५४ इतकी प्रवेश क्षमता आहे. वाणिज्य शाखेला साडेपाच लाख तर विज्ञान शाखेची प्रवेश क्षमता पावणेनऊ लाखांपर्यंत आहे. सध्या वाणिज्य, विज्ञानाचा कल वाढल्याचे सध्याच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कला शाखेवरील शिक्षकांची चिंता वाढली आहे.

शिक्षक भरती काही वर्षातून एकदाच होत असल्याने ‘डीएड’चे महत्त्व कमी झाले आणि कला शाखेला घरघर लागली. शेकडो शिक्षक दरवर्षी पटसंख्येअभावी अतिरिक्त होत आहेत. भविष्यात ही शाखा बंद पडू नये, यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून अभ्यासक्रम बदलून विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे व्यावसायिक विषय देण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे. त्यात संगणक, टायपिंग, नर्सिंग असे काही कोर्स त्यात समाविष्ट करण्यात येणार आहेत.

दोन वर्षांनी बदलणार अभ्यासक्रम

राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० नुसार पायाभूत, पूर्वतयारी, पूर्व माध्यमिक व माध्यमिक असे चार स्तर तयार करण्यात आले आहेत. नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीपासून होणार आहे. २०२६-२७ मध्ये इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी व सहावीच्या विद्यार्थ्यांचा तर २०२७-२८ पासून पाचवी, सातवी, नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम बदलणार आहे. २०२८-२९ च्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता आठवी, दहावी व बारावीच्या वर्गांसाठी नवीन अभ्यासक्रम असणार आहे.

नवीन अभ्यासक्रम, विषयांचा अभ्यास सुरू

सध्याच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत कला शाखेसाठी खूपच कमी विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केल्याचे दिसून आले आहे. दरवर्षी हाच ट्रेंड असल्याने कला शाखेचा अभ्यासक्रम बदलणे गरजेचे असून तसे नियोजन सुरू आहे. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना कोणत्या कोर्स किंवा विषयातून स्वयंरोजगार किंवा नोकरीच्या संधी उपलब्ध याचा अभ्यास केला जाणार आहे.

- श्रीराम पानझडे, प्रभारी संचालक, शालेय शिक्षण, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मक्का मदिनाजवळ भीषण अपघात! ४२ भारतीयांचा होरपळून मृत्यू; डिझेल टँकरला बस धडकली अन्...

Congo Mine Accident : तांब्याच्या खाणीवर पूल कोसळला, ४० कामगारांचा मृत्यू, शेकडो जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Vanaz Metro Subway Issues : रस्ता ओलांडायचा तर भुयारी मार्गातूनच; पण अनधिकृत पार्किंगमुळे पादचाऱ्यांचा जीव मेटाकुटीला

Stainless Steel vs Glass Electric Kettle: स्टेनलेस स्टील कि काचेची इलेक्ट्रिक केटल? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या फरक

Kalyan-Dombivli Politics:'दीपेश म्हात्रे यांच्या प्रवेशामागे कोण?'; कल्याण-डोंबिवलीचं राजकारण तापलं, भाजपमधील इनसाईड गेमची मोठी चर्चा..

SCROLL FOR NEXT