cash sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! झेडपी, महापालिका, पंचायत समिती, नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये वाढणार खर्चाची मर्यादा; किरकोळ अन्‌ घाऊक निर्देशाकांनुसार ‘इतकी’ वाढ

लोकसभा, विधानसभा निवडणूक असो की जिल्हा परिषद-पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून खर्च मर्यादा निश्चित केली जाते. वास्तविक पहाता, निवडणूक काळातील प्रचारसभा, कार्यकर्त्यांचे लाड, मतदारसंघातील वैयक्तिक कामे, यासाठी मर्यादेपेक्षा जास्त खर्च होतो.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा १ जानेवारी २०१७ मध्ये निश्चित झाली. तर नगरपरिषदांचे उमेदवार व थेट नगराध्यक्षांच्या खर्चाची मर्यादा ऑक्टोबर २०१६ मध्ये ठरली. आठ-नऊ वर्षांत विविध वस्तूंचे दर वाढले, डिझेल-पेट्रोलचेही दर बदलले, तरीपण निवडणूक खर्चाची मर्यादा ‘जैसे थे’च आहे. या पार्श्वभूमीवर आता किरकोळ व घाऊक निर्देशाकांचा अभ्यास करून निवडणूक खर्चाची मर्यादा २५ टक्क्यांपर्यंत (५० हजार ते एक लाखांपर्यंत) वाढविली जाणार आहे.

लोकसभा, विधानसभा निवडणूक असो की जिल्हा परिषद-पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून खर्च मर्यादा निश्चित केली जाते. वास्तविक पहाता, निवडणूक काळातील प्रचारसभा, कार्यकर्त्यांचे लाड, मतदारसंघातील वैयक्तिक कामे, यासाठी मर्यादेपेक्षा जास्त खर्च होतो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील खर्चाची मर्यादा वाढवावी, अशी मागणी झाली. त्याचा विचार करून राज्य निवडणूक आयोगाने आता नऊ वर्षांतील चलनवाढीचा अभ्यास सुरू केला आहे. त्याचा आधार घेऊन सध्याच्या खर्च मर्यादेत २५ टक्क्यांपर्यंत वाढ होईल, असे राज्य निवडणूक आयोगातील विश्वनिय सूत्रांनी सांगितले. दोन दिवसांत वाढीव मर्यादेची घोषणा होईल, असेही त्यांनी सांगितले.

‘या’ सूत्रानुसार मर्यादा वाढणार

अर्थव्यवस्थेतील महागाईची पातळी निश्चित करण्यासाठी ग्राहक किंमत निर्देशांक आणि घाऊक किंमत निर्देशांक वापरला जातो. घाऊक किंमत निर्देशांक वस्तूंच्या घाऊक विक्रीतील किंमतीतील बदल तथा फरक मोजण्यास मदत करतो. तर ग्राहक किंमत निर्देशांक विशिष्ट ग्राहक उत्पादनांच्या गटाच्या सामान्य किंमतीतील फरक मोजतो. याचा अभ्यास करून निवडणूक खर्चाची मर्यादा वाढविली जाणार आहे. एखाद्या निवडणुकीसाठी खर्च मर्यादा २ लाख ३० हजार किंवा ५ लाख ६० हजार अशी झाल्यास ती मर्यादा पूर्णांकात (तीन, सहा लाख) केली जाणार आहे. त्यामुळे आता उमेदवारांना खर्चाची जुळवाजुळव करण्यासाठी फार खटाटोप करावी लागणार नाही.

सध्याची खर्च मर्यादा अशी...

१) झेडपी, पंचायत समित्यांसाठी

  • सदस्य/गट झेडपी पंचायत समिती

  • ७१ ते ७५ गट ६ लाख ४ लाख

  • ६१ ते ७० गट ५ लाख ३.५० लाख

  • ५० ते ६० गट ४ लाख ३ लाख

  • ---------------------

२) महापालिकांसाठी...

  • सदस्य खर्चाची मर्यादा

  • १५१ ते १७५ १० लाख

  • ११६ ते १५० ८ लाख

  • ८६ ते ११५ ७ लाख

  • ६५ ते ८५ ५ लाख

  • --------------------

3) अन्य स्थानिक स्वराज्य संस्था

  • वर्ग नगरपंचायत थेट नगराध्यक्ष

  • अ १० लाख ३ लाख

  • ब ७.५० लाख २ लाख

  • क ५ लाख १.५० लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT