mantralay sakal
महाराष्ट्र बातम्या

घरकूल लाभार्थींसाठी मोठी बातमी! घरकुलावर सौर संच बसवायला मिळणार ‘CSR’ फंड; लाभार्थींना बॅंकेतूनही घेता येणार कर्ज; घरकूल लाभार्थींना २.१० लाख अनुदान

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थींना घरकुल बांधकाम पूर्ण झाल्यावर छतावर सौरसंच बसविण्यासाठी सीएसआर (कार्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व) फंडातून किंवा शासनाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमातून आर्थिक मदत केली जाणार आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाने तसा आदेश काढला आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थींना घरकुल बांधकाम पूर्ण झाल्यावर छतावर सौरसंच बसविण्यासाठी सीएसआर (कार्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व) फंडातून किंवा शासनाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमातून आर्थिक मदत केली जाणार आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाने तसा आदेश काढला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कार्यवाही करावी लागणार आहे.

घरकुल पूर्ण झाल्यावर लाभार्थीने विद्युतजोडणी केल्याची अधिकाऱ्यांनी खात्री करावी. त्यानंतर ‘पीएम सूर्यघर’च्या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करावी. महावितरणमार्फत पडताळणी करून मंजुरी घ्यावी. लाभार्थीला घरकुलाच्या छतावर सौर संच बसविण्यासाठी पहिल्यांदा स्वत:चे पैसे गुंतवावे लागतील. पण, लाभार्थीकडे पैसे नसल्यास महावितरणचा पुरवठादार शासनाचे अनुदान येईपर्यंत स्वत:ची रक्कम गुंतवायला तयार आहे की नाही?, याची खात्री करावी. दोघेही तयार नसल्यास लाभार्थी बॅंकेतून कर्ज घेऊ शकेल किंवा राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत स्वयंसहाय्यता गट, ग्रामसंघ किंवा प्रभाग संघातून बिनव्याजी, कमी व्याजदरात कर्ज घेऊ शकेल.

कोल्हापूर व वर्धा जिल्ह्यात असा प्रयोग करण्यात आला आहे. याशिवाय सीएसआर फंड किंवा इतर नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून सौरसंच बसविण्यास मदत करता येईल, असेही ग्रामविकास विभागाच्या आदेशात नमूद आहे. सौर संच बसविल्यावर केंद्राच्या ३० हजार आणि राज्याच्या १५ हजार रुपयांच्या अनुदानासाठी लाभार्थी पुढील कार्यवाही करू शकणार आहे.

शासनाने तसा निर्णय घेतला आहे

ग्रामीण भागातील बेघर लाभार्थी कुटुंबांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुले मंजूर केली जात आहेत. आता लाभार्थींना घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर सौरसंच बसवावा लागेल. त्यासाठी राज्य शासनाकडून १५ हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. ज्या गरजू लाभार्थींना सौर संच बसविण्यास आर्थिक अडचणी आहेत, त्यांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यावर संबंधितांना सीएसआर फंडातून मदत केली जाणार असून शासनाने तसा निर्णय घेतला आहे.

- कुलदीप जंगम, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

घरकूल लाभार्थींना २.१० लाख अनुदान

पंतप्रधान आवास योजनेतून लाभार्थीस सध्या एक लाख २० हजार रुपये बांधकामासाठी मिळतात. याशिवाय ‘मनरेगा’तून घरकूल बांधकामाची ९० दिवसांची मजुरी २८ हजार ८० रुपये मिळते. स्वच्छ भारत मिशनमधून शौचालयासाठी १२ हजार रुपये दिले जातात. आता ४ एप्रिल २०२५ च्या शासन निर्णयानुसार ५० हजार रुपये राज्य शासनाकडून मिळणार आहेत. त्यातील ३५ हजार रुपये बांधकामासाठी आणि १५ हजार रुपये सौर संच बसविल्यावर मिळणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT