सोलापूर : नोकरी किंवा रोजगाराची गरज असलेला दहावी-बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर पदवीप्राप्त उमेदवारांना आता प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या व चौथ्या आठवड्यात मुलाखत देता येणार आहे. त्यासाठी त्यांना सोलापूर शहरातील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्रात यावे लागणार आहे.
दरवर्षी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्रातर्फे बेरोजगार गरजू उमेदवारांसाठी रोजगार मेळावे आयोजित केले जातात. त्यातून हजारो तरुण-तरुणींना नोकरी, रोजगार मिळतो. पण, आता याशिवाय एक जरी जागा कोणत्या उद्योजकास भरायची असेल तर ते जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्राकडे मागणी करू शकतात. त्या उद्योजकांना मुलाखतीतून योग्य उमेदवार दिला जाणार आहे. नोकरी, रोजगाराच्या शोधात इतरत्र फिरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम खूप फायदेशीर ठरणार आहे.
मुलाखतीसाठी येताना त्या विद्यार्थ्याने शैक्षणिक पात्रता, अनुभव, वैयक्तिक कागदपत्रे घेऊन यावे लागणार आहे. जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातील उमेदवारास त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार, नोकरी हवी असेल त्याने कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्राच्या वेबसाइटवर कोणत्या ठिकाणी ती संधी उपलब्ध आहे हे पहायचे आहे. त्यानुसार तो ठरलेल्या दिवशी मुलाखतीला येऊ शकणार आहे.
‘या’ वेबसाइटवरून मिळेल जॉबची संधी
ज्या विद्यार्थ्यांना जॉबची गरज आहे, त्यांना https://www.mahaswayam.gov.in या वेबसाइटवर पाहता येईल. त्यानुसार तो उमेदवार सोलापूर शहरातील पार्क चौक परिसरातील नॉर्थकोट येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्रात येऊन मुलाखत देता येईल. याशिवाय उमेदवारांना 0217-2622113 या क्रमांकावर संपर्क साधून देखील माहिती घेता येईल.
मुलाखतीसाठी येता येईल कार्यालयात
दहावी-बारावी उत्तीर्ण उमेदवारांसह पदवी, पदव्युत्तर पदवीप्राप्त विद्यार्थी, आयटीआय, डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना देखील आमच्या कार्यालयामार्फत नोकरीची संधी उपलब्ध होईल. त्यासाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी त्या उमेदवारांना मुलाखतीसाठी कार्यालयात येता येईल.
- संगीता खंदारे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्र, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.