Mantralay maharashtra sakal media
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! ३३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार अतिवृष्टी, महापुराची नुकसान भरपाई; सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल सादर

सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल शासनाला सादर झाले असून कृषी विभागाकडूनही एकूण अहवाल रात्री उशिरा राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून (ता. १८) शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम वितरीत होईल, असे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील ३३ जिल्ह्यांना सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीचा तडाखा बसला. अतिवृष्टी व महापुरामुळे एकाच महिन्यात तब्बल ५२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल शासनाला सादर झाले असून कृषी विभागाकडूनही एकूण अहवाल रात्री उशिरा राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून (ता. १८) शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम वितरीत होईल, असे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

बीड, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, बुलडाणा, हिंगोली, परभणी, अमरावती, जळगाव, छत्रपती संभाजी नगर अशा ३३ जिल्ह्यांना सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला. बीड, सोलापूर, अहिल्यानगर, धाराशिवला पुराचा फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांची उरलीसुरली आशा पाण्यात वाहून गेली. दिवाळीपूर्वी बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्र्यांनी सांगितले. पण, अजूनही २० पेक्षा अधिक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दमडीही मिळालेली नाही. शुक्रवारी वसुबारसने दिवाळीची सुरवात झाली असून शनिवारी धनत्रयोदशी आहे.

अतिवृष्टी, पुरामुळे बाधितांची दिवाळी आनंदात जावी, यासाठी धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर भरपाईची रक्कम बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत कृषी व मदत व पुनर्वसन विभागातील अधिकाऱ्यांचे काम सुरू होते. नजर अंदाज अहवाल आणि पंचनामे अंतिम झाल्यानंतरचे एकूण बाधित क्षेत्र, याचा अहवाल कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी राज्य सरकारला पाठविला. आता दोन हेक्टरपर्यंतची मदत ‘एनडीआरएफ’मधून तर वाढीव एक हेक्टरची मदत राज्य सरकार ‘एसडीआरएफ’मधून देणार आहे.

शासनाकडून लवकरच मिळेल मदत

राज्य सरकारला अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झाल्याचा अहवाल पाठविण्यात आला आहे. त्यात दोन हेक्टर व दोन हेक्टरवरील बाधित शेतकऱ्यांची माहिती स्वतंत्र देण्यात आली आहे. दोन हेक्टरपर्यंतची मदत केंद्राकडून तर त्यावरील मदत राज्य शासनाकडून मिळणार आहे.

- शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

पंचनामे अहवालाची स्थिती

  • बाधित जिल्हे

  • ३३

  • एकूण बाधित क्षेत्र

  • ५२.३९ लाख हेक्टर

  • अंदाजे बाधित शेतकरी

  • ६९.२० लाख

  • भरपाईची अपेक्षित रक्कम

  • ६,५०० कोटी

बॅंक खात्यासह बाधितांच्या याद्या अपलोड
पंचनाम्यांचे अहवाल सादर झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांच्या याद्या (बॅंक खाते क्रमांकासह) अपलोड करण्याचे काम देखील जिल्हास्तरावर युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तशा सूचना सर्व महसूल कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. जेणेकरून दिवाळी संपण्यापूर्वी सर्व बाधित शेतकऱ्यांना भरपाई मिळेल हा हेतू आहे. ज्या जिल्ह्यातील बाधितांच्या याद्या अपलोड झाल्या आहेत, त्यांना शनिवारी मदत वितरीत होणार आहे. याद्या जसजशा अपलोड होतील, तशी भरपाईची रक्कम थेट त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात सात दिवस धोक्याचे! पावसाबाबत मोठी अपडेट समोर, हवामान विभागाकडून इशारा जारी

Lawrence Bishnoi: वेळीच स्वतःला सुधारा नाहीतर...; लॉरेन्स बिश्नोई टोळीला उघड इशारा, धमकी देणारा रोहित गोदरा नेमका कोण?

IND vs AUS: पहिला वनडे सामना हरूनही कर्णधार शुभमन गिल समाधानी; कारण सांगताना म्हणाला, 'या मॅचने आम्हाला...'

Pune Cyber Fraud : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने पुण्यातील व्यावसायिकाची दीड कोटींची फसवणूक

Diwali Get-Together Recipes: दिवाळी गेट-टुगेदरची मजा आणि शान वाढवा खास दुधी-अलमंड-हनी हलवा आणि कुरकुरीत छोले-कबाबसह!

SCROLL FOR NEXT