अतिवृष्टी sakal
महाराष्ट्र बातम्या

ब्रेकिंग! 18 दिवसांत अतिवृष्टीने राज्यातील ‘या’ जिल्ह्यातील 3.73 लाख हेक्टरवरील पिके भुईसपाट; कृषी विभागाचा नजर अंदाज अहवाल; पंचनामे करण्यास ई-पीक पाहणीची अडचण

राज्यात दररोज सरासरी सात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. दुसरीकडे राज्यातील २१ लाख शेतकऱ्यांकडे बॅंकांचे ३२ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकले आहे. त्यांना नव्याने कर्ज मिळत नाही. अशातच फेब्रुवारी ते ऑगस्ट या काळात साडेपाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान होऊनही बळिराजाला भरपाई मिळालेली नाही.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : जुलैमध्ये विश्रांती घेतलेला पाऊस ऑगस्टमध्ये मुसळधार कोसळत असून नदी, नाल्यांना पूर आला असून धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. १ ते १८ ऑगस्टपर्यंत कृषी विभागाच्या नजर अंदाज अहवालानुसार राज्यातील नांदेड, अकोला, हिंगोली, परभणी, यवतमाळ, सोलापूर, धाराशिव, जालन्यासह १७ जिल्ह्यांमधील तीन लाख ७३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे. सातारा, सांगली, नाशिक या जिल्ह्यात व कोकण विभागात अतिवृष्टी झाली, पण तेथे नुकसान नसल्याचेही नजर अंदाज अहवालात नमूद आहे.

मे महिन्यात मुसळधार पडलेल्या पावसाने जूनमध्ये अधूनमधून हजेरी लावली तर जुलैमध्ये मोठी विश्रांती घेतली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा, मका, सोयाबीन, उडीद अशा पिकांची लागवड केली. याशिवाय द्राक्ष, केळी, डाळिंब अशा बागांचीही मशागत झाली होती. मात्र, मागील १८ दिवसांत सलग पडलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील सुमारे १८७ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. बाधित शेतकऱ्यांच्या शेतात गुडघाभर पाणी असून नदी, ओढ्याच्या काठावरील शेतकऱ्यांची तर खूपच दयनिय स्थिती आहे.

दरम्यान, फेब्रुवारी ते जून या महिन्यातील पावसामुळे देखील राज्यातील २७ जिल्ह्यांमधील एक लाख ८० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. प्रत्यके जिल्ह्यांनी त्याचे अहवाल पाठविले, पण अजूनही सर्व बाधित शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. आता ऑगस्टमधील पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये ओला दुष्काळासारखी स्थिती निर्माण झाली आहे. बाधित क्षेत्रात आणखी वाढ होऊ शकते, असे कृषी आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

नुकसानीची माहिती घेणे सुरूच

ऑगस्ट महिन्यातील मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील ३० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीसंदर्भातील तालुकानिहाय माहिती घेण्याची कार्यवाही सुरू आहे.

- शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

पावसाच्या नुकसानीची आकडेवारी

  • फेब्रुवारी ते जूनपर्यंतचे नुकसान

  • १.८० लाख हेक्टर

  • बाधित जिल्हे

  • २७

  • ऑगस्टमधील नुकसान

  • ३.७३ लाख हेक्टर

  • बाधित जिल्हे

  • १७

पंचनामे करण्यास ई-पीक पाहणीची अडचण

राज्यात दररोज सरासरी सात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. दुसरीकडे राज्यातील २१ लाख शेतकऱ्यांकडे बॅंकांचे ३२ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकले आहे. त्यांना नव्याने कर्ज मिळत नाही. अशातच फेब्रुवारी ते ऑगस्ट या काळात साडेपाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान होऊनही बळिराजाला भरपाई मिळालेली नाही. आता ई-पीक पहाणीची ऑनलाइन नोंद होत नसल्याने नुकसान भरपाई कशी व कधीपर्यंत मिळणार, याची बळिराजाला चिंता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident : दोन दिवस जेवलो नाही, खूप शोधलं पण... ताम्हिणी घाटातील अपघाताचे दृश्य पाहून मृत तरुणांचे मित्र ढसाढसा रडले

Mangalwedha News : कात्राळचे शहीद जवान बाळासाहेब पांढरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Pachod Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार; पाचोड पैठण रस्त्यावरील घटना

Delhi Mumbai Express way : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर आता हेलिकॉप्टरची सेवा; अपघातातील जखमींना एअरलिफ्ट करता येणार, पर्यटनालाही चालना

Latest Marathi News Update : देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT