solapur city action in income tax team

 

sakal solapur

महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! सोलापुरातील ‘या’ ७ बड्या व्यावसायिकांवर इन्कम टॅक्सची धाड; ४० गाड्यांतून ९० अधिकाऱ्यांची फौज सोलापुरात, गोपनीय हिशेबाच्या डायऱ्या सापडल्या

बुधवारी सूर्योदयाच्या आधीच शहरातील 7 बड्या व्यक्तींची घरे, दुकाने व व्यावसायांवर आयकर पथकाने धाडी टाकल्या. त्यात सराफ व्यापारी आपटे, त्यांचे व्यावसायिक भागिदार वेणेगुरकर आणि कोळी, हेरिटेजचे मनोज शहा, किमया कन्स्ट्रक्शनचे समीर गांधी, सराफ व्यापारी नारायणपेठकर, ॲड. उमेश मराठे यांचा समावेश आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : बुधवारी सूर्योदयाच्या आधीच शहरातील सात बड्या व्यक्तींची घरे, दुकाने अन् व्यावसायांवर आयकर पथकाने धाडी टाकल्या. त्यात सराफ व्यापारी आपटे, त्यांचे व्यावसायिक भागिदार वेणेगुरकर आणि कोळी, हेरिटेजचे मनोज शहा, किमया कन्स्ट्रक्शनचे समीर गांधी, सराफ व्यापारी नारायणपेठकर, ॲड. उमेश मराठे यांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, पुणे जिल्ह्यातील तब्बल ९० आयकर अधिकारी मंगळवारी रात्री कर्नाटकातील विजयपूर येथे मुक्काम केले. पहाटे तीन वाजता तीर्थयात्रेचे स्टीकर्स लावून ४० गाड्यांतून सोलापूरकडे रवाना झाले. सकाळी ६ वाजता सोलापुरात सात जणांशी संबंधित ठिकाणांवर धाडी टाकल्या. वेगवेगळी शक्कल वापरून शासनाचा कर चुकविणाऱ्या सोलापूर शहरातील काहींची माहिती आयकर विभागाला मिळाली होती. त्याची खात्री करून सर्च वॉरंट घेऊनच अधिकारी संबंधित व्यक्तींच्या दारापर्यंत पोचले. त्यांच्या दिमतीला सोलापूर शहर पोलिस देखील होते. दरम्यान, समोर दिसणाऱ्या व्यावसायाच्या आडून रिअल इस्टेटच्या माध्यमातून कर चोरी केली जाते. काळा पैसा रियल इस्टेट व दागिन्यांमधून कमावला जातो, यामुळे देखील ‘आयकर’कडून छापेमारी केली जाते, असे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.

चुकविलेल्या टॅक्सवर २०० टक्के दंड, व्याज लावून टॅक्सची मूळ रक्कम वसूल केली जाते. या पार्श्वभूमीवर संबंधितांचे व्यवहार तपासण्यासाठी सोलापुरात आलेल्या आयकर अधिकाऱ्यांसमवेत सॉफ्टवेअर, आयटी इंजिनिअरही होते. धाडीनंतर या बड्या व्यक्तींनी त्यांच्या ‘सीए’ला बोलावले. पण, आयकर अधिकाऱ्यांनी त्यांना तेथे येऊ दिले नाही. संबंधितांचे जबाब, व्यवहाराची चौकशी झाल्यावर अधिकाऱ्यांनी ‘सीए’शी संवाद साधला. धाडीवेळी हिशेबाच्या गोपनीय डायरी, कागदपत्रे देखील अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहेत. टॅक्स चोरीची रक्कम मोठी असल्याने उद्याही (गुरुवारी) पुन्हा चौकशी होऊ शकते, असेही सूत्रांनी सांगितले.

टॅक्स चोरीचा ठपका; आपटेंच्या सर्व आस्थापनांची चौकशी

सोलापुरातील प्रसिद्ध सराफ व्यापारी म्हणून आपटेंची ओळख आहे. ते रिअल इस्टेट व्यावसायातही उतरले आहेत. त्यांच्यासोबत वेणेगुरकर व कोळी हे पार्टनर आहेत. आयकर विभागाने कर चोरी केल्याचा ठपका ठेवत त्यांच्या पुण्यातील व सोलापुरातील सर्वच आस्थापनांवर धाडी टाकल्या. अंत्रोळी (ता. दक्षिण सोलापूर) येथील दूध डेअरी, सोलापुरातील सराफ बाजारातील सोने व चांदीच्या दोन्ही दुकानात अधिकारी ठाण मांडून होते. मागील सात ते आठ वर्षांचे व्यवहार आयकर अधिकाऱ्यांनी तपासले, त्यामुळे सगळेच चिंतेत होते.

ठळक बाबी...

  • तिर्थयात्रेचे स्टिकर लावून विजयपूरवरून निघालेले ९० अधिकारी सहाळी सहा वाजता ३५ गाड्यांमध्ये सोलापुरात दाखल

  • झोपेतून उठण्यापूर्वीच सोलापूर शहरातील सात बड्या व्यक्तींच्या घरी, व्यावसायाच्या ठिकाणी धाडी

  • पहाटे सहा वाजल्यापासून सात जणांच्या आठ वर्षांतील व्यवहारांची तब्बल २० तास चौकशी

  • दुकानात, घरी बाहेरील कोणालाही येऊ दिले नाही, चौकशीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग

  • समीर गांधी यांच्या घरात आहे रविवारी विवाह सोहळा; अचानक पडलेल्या धाडीमुळे घरातील सगळेच चिंतेत

  • सात रस्ता परिसरातील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये होती अधिकाऱ्यांच्या मुक्कामाची सोय

तब्बल १८ ते २० तास चौकशी, अधिकाऱ्यांनी केले दोनवेळचे जेवण जागेवरच

आयकर विभागाच्या पथकांतील अधिकाऱ्यांनी विजयपूर येथे आदल्यादिवशी मुक्काम केला. तेथील एक स्वतंत्र हॉटेल बुकिंग केले होते. त्यानंतर बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास पथके सोलापूरच्या दिशेने रवाना झाली. सोलापुरात आल्यानंतर सकाळी सहा वाजता पथकांनी प्रसिद्ध सराफ व्यापारी आपटे व त्यांचे व्यावसायिक पार्टनर वेणेगुरकर व कोळी यांच्यासह हेरिटेजचे मालक शहा, समीर गांधी, नारायणपेठकर, उमेश मराठे यांच्या घरी धाडी टाकल्या. रात्री ११ वाजले तरी चौकशी सुरुच होती. तब्बल १८ ते २० तासांच्या या चौकशीवेळी पथकातील अधिकाऱ्यांनी दोनवेळचे जेवण जागेवरच केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT