शिक्षक भरती Google
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! प्राध्यापक भरतीच्या मुलाखती आचारसंहितेत अडकणार; फेब्रुवारी-मार्चमध्ये मुलाखती; महाविद्यालयांमधील प्राध्यापक भरती ‘या’ निकषांनुसार

राज्यातील अकृषिक विद्यापीठांमधील ७०० तर संलग्नित उच्च महाविद्यालयांमधील साडेपाच हजार प्राध्यापक भरतीची कार्यवाही सुरू झाली आहे. सध्या अर्जांची छाननी सुरू असून डिसेंबरमध्ये पात्र-अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. पण, मुलाखतीसाठी जिल्हा परिषदा व महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडथळा येणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी-मार्चमध्येच पात्र उमेदवारांच्या मुलाखती होतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील अकृषिक विद्यापीठांमधील ७०० तर संलग्नित उच्च महाविद्यालयांमधील साडेपाच हजार प्राध्यापक भरतीची कार्यवाही सुरू झाली आहे. सध्या अर्जांची छाननी सुरू असून डिसेंबरमध्ये पात्र-अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. पण, मुलाखतीसाठी जिल्हा परिषदा व महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडथळा येणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी-मार्चमध्येच पात्र उमेदवारांच्या मुलाखती होतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

विद्यापीठ व उच्च महाविद्यालयांमधील प्राध्यापक भरतीत ७५ टक्के गुण शैक्षणिक पात्रतेसाठी तर २५ टक्के गुण मुलाखतीसाठी असणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात प्राध्यापकांची सात पदे भरली जात आहेत. तीन महिन्यांपूर्वी जुन्याच निकषांनुसार उमेदवारांकडून भरतीचे अर्ज मागविले होते. पण निकषात बदल झाल्याने त्याच उमेदवारांना दुसऱ्यांदा अर्ज करावे लागले आहेत.

आता अर्जांची छाननी, पात्र उमेदवारांची यादी, अपात्र झालेल्या उमेदवारांना अर्जातील त्रुटींच्या पूर्ततेसाठी सात दिवसांची मुदत व अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर एक महिना अगोदर पात्र उमेदवारांना मुलाखतीची पत्रे पाठविली जाणार आहेत. मुलाखती सीसीटीव्हीच्या कक्षेत, व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये होतील. मुलाखतीसाठी राज्यपाल नियुक्त सदस्य, विषय तज्ज्ञ, कुलगुरू, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी असतील. आचारसंहितेनंतर राज्यपालांकडून मुलाखतीसाठी तज्ज्ञांची नेमणूक होईल. ३१ मार्चपूर्वी प्राध्यापक भरती पूर्ण होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

पात्र उमेदवारांना मुलाखतीसंदर्भातील पत्रे पाठविली जातील

शासनाच्या नव्या निकषांनुसार प्राध्यापक व संविधानिक पदांची भरती प्रक्रिया राबविली जात आहे. सध्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी सुरू असून त्यानंतर पात्र-अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. काहींच्या अर्जात त्रूटी असल्यास त्यांना सात दिवसांची मुदत दिली जाईल. त्यानंतर एक महिना अगोदर पात्र उमेदवारांना मुलाखतीसंदर्भातील पत्रे पाठविली जातील.

- डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्र कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

महाविद्यालयांमध्येही ‘७५-२५’प्रमाणेच भरती

उच्च शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार आता प्राध्यापक भरतीत ७५ गुण उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेसाठी असणार आहेत. उर्वरित २५ गुण मुलाखतीसाठी असतील. भरतीपूर्वी संबंधित उच्च महाविद्यालयास विद्यापीठाला कळवावे लागेल. विद्यापीठाकडून मुलाखत व निवडीसाठी एक समिती दिली जाते. याशिवाय दिव्यांग, मागासवर्गीय असे सदस्यदेखील असणार आहेत. आता सर्व महाविद्यालयांकडील रिक्त पदांची माहिती घेऊन विद्यापीठाकडून शासनाला पाठविण्याची कार्यवाही सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Shiv Sena setback: पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; २६ वर्षांतल्या ९ संपर्कप्रमुखांपैकी ५ जणांनी सोडली साथ, चौघे शिंदे गटात

Pune Nashik Railway : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग कायम ठेवण्याचा निर्धार; जीएमआरटीकडून अडथळा नसल्याचा लोकप्रतिनिधींचा दावा

भविष्यवेध : बीएस्सी ॲग्रीकल्चर की बी. फार्मसी?

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

SCROLL FOR NEXT