mantralay sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! जिल्हा परिषदांच्या मतदानापूर्वी लाडकी बहीण अन् शेतकऱ्यांना मिळणार १५०० अन्‌ २००० रुपये; ५ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेसाठी मतदान

महापालिकेच्या मतदानाआधी लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे १५०० रुपये वितरित झाले. आता ५ फेब्रुवारीला जिल्हा परिषदेसाठी मतदान होणार आहे. त्याच्या आधी शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून सन्मान निधीचा आणि लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता वितरित होणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : महापालिकेच्या मतदानाआधी लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे १५०० रुपये वितरित झाले. आता ५ फेब्रुवारीला जिल्हा परिषदेसाठी मतदान होणार आहे. त्याच्या आधी शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून सन्मान निधीचा आणि लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता वितरित होणार आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील साडेनऊ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून १५०० तर सव्वापाच लाख शेतकऱ्यांना २००० रुपये मिळतील.

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना सुरु केली. त्यातून शेतकऱ्यांना दरवर्षी (प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपये) सहा हजार रुपये मिळतात. केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु केली. त्यातून देखील प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. केंद्र सरकारकडून २१ वा हप्ता वितरित झाला आहे. आता राज्य सरकारकडून देखील फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांना सन्मान निधी वितरित केला जाणार आहे.

राज्यातील ९१ लाख ९७ हजार शेतकरी सन्मान निधीचे लाभार्थी आहेत. त्यांच्यासाठी कृषी विभागाने वित्त विभागाकडे एक हजार ९३० कोटी रुपयांचा निधी मागितला आहे. कृषी विभागाचे उपसंचालक गजानन सोनकांबळे यांनी यासंदर्भात माहिती दिली. दरम्यान, ऐन निवडणुकीत लाडक्या बहिणींना लाभ वितरित करण्यावर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. राज्यातील ग्रामीण भागात सव्वा कोटींहून अधिक लाडक्या बहिणी आहेत. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस तथा विरोधी पक्षाची भूमिका काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘सन्मान निधी’ची सोलापूरची स्थिती

  • लाभार्थी शेतकरी

  • ५.२६ लाख

  • अपेक्षित निधी

  • ११९.६० कोटी

  • चार महिन्याला मिळतात

  • २००० रुपये

  • हप्ता मिळणारा महिना

  • फेब्रुवारी २०२६

अडीच लाख शेतकऱ्यांचा थांबला लाभ

एका कुटुंबातील एकाच शेतकऱ्याला (फेब्रुवारी २०१९ पूर्वीची जमीन असलेले शेतकरी खातेदार) प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा लाभ दिला जातो. तरीपण, एकाच कुटुंबात पती-पत्नी, मुलगा असे तिघेही योजनेचा लाभ घेत होते. केंद्र शासनाकडून याची पडताळणी झाली. राज्यात अडीच लाख शेतकरी अशा प्रकारचे निघाले. यात सोलापूर जिल्ह्यातील देखील शेतकरी आहेत. आता त्या कुटुंबातील कोणत्या एकाचा लाभ पुढे कायम ठेवायचा हे त्यांनी लिखित द्यायचे आहे. त्यानंतर अशा कुटुंबातील एकाचा लाभ पुढे कायम सुरु राहील, असे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम! टेम्पो पलटी झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा, 4-5 तासांपासून भीषण कोंडी

Revanth Reddy Remarks : ‘महादेव गरिबांचे, राम श्रीमंतांचे’ रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले; भाजप आक्रमक

Marathi News Live Updates: अंगारकी चतुर्थीनिमित्त मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी, मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण

World Heart Day 2026: कार्डिओफोबिया म्हणजे काय? लक्षणे, कारणे आणि उपचार याबद्दल संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर!

SCROLL FOR NEXT