सोलापूर : सिद्धेश्वर बाजार समितीमध्ये कांदा लिलावासाठी जागा अपुरी पडत असल्याने नवीन जागेची मागणी वारंवार पुढे येत होती. त्यासाठी बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळाने बाजार समितीच्या विस्तारीकरणास हिरवा कंदील दाखवला आहे. बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथे कांदा लिलावासाठी ४० एकर जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयास बाजार समिती संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. आता पणन संचालकांच्या मंजुरीनंतर जमीन खरेदीचा मार्ग मोकळा होणार आहे.
बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समिती संचालक मंडळाची सभा पार पडली. सभेत विषयपत्रिकेवरील ४५ विषयांना मंजुरी देण्यात आली. बाजार समितीचे प्रशासकीय कामकाज सुरळीत चालण्यासाठी नवीन सॉफ्टवेअर तयार करणे, सोलर पॅनेल बसवणे, मुख्य प्रवेशद्वारासह इतर प्रवेशद्वाराचे अंदाजपत्रक तयार करणे यासह सिमेंट रस्त्यांच्या कामांची बिले अदा करणे, पहिल्या मजल्यावरील बैठक सभागृहाच्या नूतनीकरणाच्या कामाची बिले अदा करण्यास संचालक मंडळाने मंजुरी दिली. आता पणन संचालकांच्या मंजुरीनंतर पुढील तीन महिन्यांत जमीन खरेदी प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात अधिकाऱ्यांनी सांगितले.
रस्ते स्वच्छतेसाठी नवीन स्वीपर मशीन व ट्रॅक्टर
बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बाजार समितीमधील अंतर्गत रस्ते स्वच्छतेसाठी नवीन स्वीपर व ट्रॅक्टर खरेदीच्या विषयास मंजुरी देण्यात आली. याशिवाय बाजार समितीच्या विस्तारीकरणासाठी नवीन जमीन खरेदी करण्याच्या विषयास एकमताने मंजुरी देण्यात आली. बाजार समितीमध्ये विशेषतः कांदा, मिरची, फळे व भाजीपाला विभागात मोठ्या प्रमाणात कचरा होतो. वाहनांची मोठी वर्दळ असल्याने दोन-दोन दिवस कचरा तसाच पडून राहतो. यामुळे आता स्वच्छतेसाठी स्वीपर मशीन व ट्रॅक्टर खरेदीस संचालक मंडळाने मंजुरी दिली.
मंजुरीनंतर जागेची खरेदी केली जाणार
बाजार समितीच्या विस्तारीकरणासाठी बोरामणी येथे ४० एकर जमिनीची पाहणी केली आहे. बाजार समितीमध्ये कांद्याची मोठी उलाढाल वाढली आहे. बाजार समितीकडे पैसे शिल्लक आहेत. कांदा लिलावासाठी नवीन जागेचा शोध सुरू होता. संचालक मंडळाने जागा खरेदीस मंजुरी दिली आहे. आता पणन संचालकांच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव सादर केला असून मंजुरीनंतर जागा खरेदी केली जाईल.
- दिलीप माने, सभापती, सिद्धेश्वर बाजार समिती, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.