sarpanch_ 
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! सोलापूरसह राज्यातील १४,२३४ ग्रामपंचायतींवर आता प्रशासक; ‘या’ ४ विभागाचे विस्ताराधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षकांवर जबाबदारी; निवडणूक कधी? वाचा...

जानेवारी ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर व नवनिर्मित ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यास ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली आहे. विस्ताराधिकारी किंवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी ग्रामपंचायतींवर प्रशासक असावा, असा नियम आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : जानेवारी ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर व नवनिर्मित ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यास ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली आहे. विस्ताराधिकारी किंवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी ग्रामपंचायतींवर प्रशासक असावा, असा नियम आहे. त्यानुसार ग्रामपंचायत, कृषी, शिक्षण व आरोग्य विभागाचे विस्ताराधिकारी आणि त्यांच्या समकक्ष अंगणवाडी पर्यवेक्षक, पशुधन पर्यवेक्षक यांच्याकडे सोलापूर जिल्ह्यातील ६५८ ग्रामपंचायतींच्या प्रशासकाची जबाबदारी सोपविली जाणार आहे. राज्यातही अशीच कार्यवाही होईल. पण, विस्ताराधिकाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे अन्‌ दुसरीकडे राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींची मुदत काही महिन्यांत संपणार आहे. त्यामुळे एकाच विस्ताराधिकाऱ्यांकडे तीन-चार ग्रामपंचायतींचा पदभार जाईल, अशी सद्य:स्थिती आहे.

तीन-साडेतीन वर्षांनंतर महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांवरील ‘प्रशासकराज’ संपले. आता नुकत्याच महापालिका, नगरपालिकांची निवडणूक संपली. सध्या सोलापूरसह राज्यातील १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांची निवडणूक सुरु आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांची निवडणूक होणार आहे. या निवडणुकांमुळे जानेवारी-फेब्रुवारी २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमावा लागणार आहे. त्यानुसार जानेवारीअखेर व फेब्रुवारी- मार्च आणि डिसेंबर २०२६ पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील कोणकोणत्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांचे पाच वर्षे पूर्ण होतात, याची माहिती जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागाने तालुक्यांकडून मागविली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तसे पत्र पाठविण्यात आले आहे.

विस्ताराधिकाऱ्यांची संख्या अशी...

  • विभाग कार्यरत विस्ताराधिकारी

  • ग्रामपंचायत ६१

  • आरोग्य १५

  • कृषी १९

  • शिक्षण ३२

सर्व विभागांची मागविली माहिती

सोलापूर जिल्हा परिषदेकडील ग्रामपंचायत विभागाकडे विस्ताराधिकारी पुरेसे नाहीत. त्यामुळे आता मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून त्यांची संख्या अपुरी पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मुदत संपलेल्या त्या-त्या ग्रामपंचायतींचे प्रशासकपद ग्रामपंचायत, कृषी, शिक्षक, आरोग्य या विभागाकडील विस्ताराधिकाऱ्यांची माहिती मागविली आहे.

- कुलदीप जंगम, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

निवडणूक कार्यक्रमासाठी किमान ३ महिने

ग्रामपंचायतींची मुदत संपणाऱ्यापूर्वी तीन महिने आधी निवडणुकीची तयारी सुरु होते. पहिल्यांदा प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी, हरकती व अंतिम मतदार यादी तयार होते. त्याचवेळी प्रभाग रचना, त्यावरील हरकती व अंतिम प्रभागरचना असा तो कार्यक्रम असतो. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरणे, माघार, चिन्हवाटप, प्रचार, मतदान व निकाल, यासाठीही एक महिना लागतो. या पार्श्वभूमीवर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर ही कार्यवाही पूर्ण होईल. त्यामुळे पावसाळ्यात निवडणूक शक्य नसल्याने दिवाळीत या ग्रामपंचायतींची निवडणूक होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Tweet on NCP President Post : ‘’राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण..’’ ; राज ठाकरेंच्या ट्वीटने खळबळ

Latest Marathi News Live Update: रयत शिक्षण संस्थेच्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील निर्माणधीन इमारतीचा स्लॅब कोसळला

Horoscope Prediction : 1 फेब्रुवारीला बनतोय रवी पुष्यचा अत्यंत शुभयोग; या पाच राशींना मिळणार भरभरून लाभ

Dhule News : सावधान! मृत किंवा अपात्र सदस्यांची नावे स्वतःहून कमी करा, अन्यथा धुळे जिल्हा प्रशासनाचा कारवाईचा इशारा

IND vs NZ, 5th T20I: काळजी करू नका संजू सॅमसन..., टॉस जिंकल्यावर सूर्यकुमारने जाहीर केले प्लेइंग इलेव्हनमधील मोठे बदल

SCROLL FOR NEXT