₹500 stamps in property transactions.

 
Sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! आता ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर वडिलोपार्जित जमिनीची वाटणी; महसूल विभागाची घोषणा; नेमकी कार्यवाही कशी होणार, वाचा...

वडिलोपार्जित जमीन, जागांची मुला-मुलींच्या नावे वाटणी आता अवघा ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर होणार आहे. त्यासंदर्भातील शासन निर्णय अजून निघालेला नाही, पण महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तशी घोषणा केली आहे. यामुळे पाच ते ३० हजार रुपयांपर्यंत बचत होणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : वडिलोपार्जित जमीन, जागांची मुला-मुलींच्या नावे वाटणी आता अवघा ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर होणार आहे. त्यासंदर्भातील शासन निर्णय अजून निघालेला नाही, पण महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तशी घोषणा केली आहे. यामुळे पाच ते ३० हजार रुपयांपर्यंत बचत होणार आहे.

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम ८५ नुसार संयुक्त धारणेतील जमिनीत एकापेक्षा जास्त सहधारक असतील तर त्यांना त्यांच्या वाटणीच्या हिश्श्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करता येतो. मात्र, मालकी हक्काबाबत वाद असल्यास दिवाणी न्यायालयाचा निकाल येईपर्यंत वाटणी थांबते. आदेशानंतर वाटणीची कार्यवाही तहसीलदारांमार्फतही केली जाते. त्यासाठी एक रुपयाचे देखील शुल्क लागत नाही.

याशिवाय संमतीने वडील त्यांच्या मुलांना जमीन, जागेची वाटणी देत असतील तर सध्या त्यासाठी एक-दोन टक्के स्टॅम्प ड्यूटी, नोंदणी शुल्क व २०० ते ५०० रुपयांचा स्टॅम्प पेपर लागतो. पण, महसूल विभागाच्या प्रस्तावित निर्णयानंतर कोणतेही शुल्क न भरता अवघ्या ५०० रुपयांत वडिलोपार्जित जमिनीचे हिस्से मुलांच्या नावे करता येणार आहेत. सर्वांची संमती आणि वाटप होणारे क्षेत्र निश्चित केलेला स्टॅम्प दुय्यम निबंधक कार्यालयात दिल्यावर त्याठिकाणी संबंधित मुलांच्या नावे तेवढे क्षेत्र होईल, अशी कार्यपद्धती असणार आहे.

शासन निर्णय अजून नाही, निर्णयानंतर होईल कार्यवाही

सध्या वडिलोपार्जित किंवा वडिलांच्या नावावरील जमीन मुलांच्या नावे करण्यासाठी वाटणीपत्र केले जाते. त्यासाठी एक टक्के नोंदणी फी व ५०० रुपयांचा स्टॅम्प लागतो. जागेसाठी मात्र दोन टक्के स्टॅम्प ड्यूटी व एक टक्का नोंदणी फी द्यावी लागते. आता यात बदल होणार आहे, पण त्यासंदर्भातील शासन निर्णय निघालेला नाही. शासन निर्णयानंतर त्यानुसार कार्यवाही केली जाईल.

- अनिकेत बनसोडे, जिल्हा मुद्रांक शुल्क अधिकारी, सोलापूर

सध्या वाटणीपत्र, बक्षीसपत्राची पद्धत...

  • वडिलांची प्रॉपर्टी मुला-मुलींच्या नावे करण्यासाठी वाटणीपत्र, बक्षीसपत्र केले जाते. त्याअंतर्गत इतरांप्रमाणे दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन नियमित स्टॅम्प ड्यूटी भरावी लागत नाही.

  • वडिलांच्या जमीन वाटणीसाठी एक ते तीन हजारांपर्यंत नोंदणी फी (जमिनीच्या बाजारमूल्याच्या प्रमाणात) व ५०० रुपयांचा स्टॅम्प लागतो. त्यावर प्रॉपर्टीचा हिस्सा मुलांच्या नावे करता येतो.

  • जमिनीचा काही हिस्सा मुलीच्या किंवा बहिणीच्या नावे करताना बक्षीसपत्र करावे लागते. त्यासाठी एक टक्का स्टॅम्प ड्यूटी व २०० रुपयांचा स्टॅम्प द्यावा लागतो.

  • वडिलांच्या नावावरील प्लॉटमधील हिस्सा मुला-मुलींच्या नावे करण्यासाठी दोन टक्के स्टॅम्प ड्यूटी द्यावी लागते. तसेच एक टक्का नोंदणी शुल्क देखील भरावे लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Students Poisoned During Trip : अक्कलकोटहून कोल्हापुरात सहलीसाठी आलेल्या मुलींना विषबाधा, ६ ते ७ जणांना बाधा

एपस्टीन फाइल्समध्ये जोहरान ममदानी यांच्या आईचंही नाव; मीरा नायर पार्टीत कशासाठी गेल्या होत्या?

मुंबईकरांनो सावधान! तब्येतीची घ्या काळजी, Viral Video नंतर तुमचंही वाढेल टेंशन

Badlapur: संसाराला आता कुठे सुरूवात झाली होती पण..., बदलापूर रेल्वे स्थानकात २८ वर्षीय तरुणीचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : शरद पवारांच्या भेटीनंतर पार्थ यांचा सुनेत्रा पवारांना फोन

SCROLL FOR NEXT