zp schools sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! शाळांमध्ये आता क्रीडा, कला, कार्यानुभव शिक्षकांची भरती; पवित्र पोर्टलद्वारे होणार पदभरती; उमेदवारांना ‘टेट’ उत्तीर्णची अट

इयत्ता पाचवी ते दहावीच्या वर्गांची पटसंख्या विचारात घेऊन इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी आता क्रीडा, कला व कार्यानुभव शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार २०२४-२५ च्या संचमान्यतेत ही पदे भरण्यास मान्यता मिळाली आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : इयत्ता पाचवी ते दहावीच्या वर्गांची पटसंख्या विचारात घेऊन इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी आता क्रीडा, कला व कार्यानुभव शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार २०२४-२५ च्या संचमान्यतेत ही पदे भरण्यास मान्यता मिळाली आहे. त्यानुसार आगामी दोन महिन्यांत पवित्र पोर्टलद्वारे सर्व शाळांच्या पटसंख्येनुसार ही पदे भरली जाणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या शाळा, खासगी अनुदानित माध्यमिक शाळा, महापालिका व नगरपालिकांच्या शाळांमध्ये आता कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. अल्पसंख्याक शाळांमधील पदभरती स्वतंत्रपणे होत असल्याने त्यांची पदभरती यात समाविष्ट नसणार आहे. या पदांसाठी उमेदवार ‘टेट’ (शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी) उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. ही पदभरती करताना इयत्ता पाचवी ते दहावीच्या वर्गातील एकूण पटसंख्या विचारात घेतली जाते.

२५० पटसंख्या असल्यास क्रीडा शिक्षक, ५०० पटसंख्या असल्यास क्रीडा व कला शिक्षक मंजूर होतील. तसेच एकूण पटसंख्या ७५० असल्यास क्रीडा, कला व कार्यानुभव शिक्षक अशी तीन पदे मंजूर होतात. पुढील दोन महिन्यांत ही शिक्षक भरती होणार असून सध्या पवित्र पोर्टलवरील नोंदणीकृत उमेदवारांची यादी तयार केली जात आहे. संबंधित शैक्षणिक संस्थांना आगामी काही दिवसांत रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध कराव्या लागतील; त्यानुसार ही पदे भरली जाणार आहेत.

संस्थापकांचे प्राधान्य कोणत्या पदासाठी?

वित्त विभागाने एकूण रिक्त पदांपैकी ८० टक्केच पदभरतीस मान्यता दिलेली आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्था त्यांच्या एकूण रिक्त पदांपैकी कोणती पदे (नियमित की क्रीडा-कला-कार्यानुभव शिक्षक) भरण्यास प्राधान्य देणार, हेही या भरतीत महत्त्वाचे ठरणार आहे. पवित्र पोर्टलद्वारे ही भरती होणार असल्याने पोर्टलवरूनच उमेदवार त्या शाळेत मुलाखतीसाठी पाठविले जाणार आहेत.

शासन निर्णयानुसार होईल कार्यवाही

आगामी शिक्षक भरतीत नियमित शिक्षकांसह क्रीडा, कला व कार्यानुभव शिक्षक देखील भरले जाणार आहेत. शाळांची पटसंख्या ‘यू-डायस’वरून घेतली जाणार आहे. पटसंख्येचा निकष पूर्ण करणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही काही पदे भरली जातील. तत्पूर्वी, त्यासंदर्भातील शासन निर्णय निघेल.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT