सोलापूर : जमीन किंवा जागा मोजताना अनेकदा शेजारील व्यक्ती किंवा मूळ मालक नसताना देखील खोट्या व्यक्तींना उभा करुन मोजणी करुन घेतली जाते. खोटी नावे सांगून पंचनामा जबाबावर स्वाक्षरी केल्या जातात. मात्र, आता जागा किंवा जमिनीची मोजणी करताना त्याठिकाणी उपस्थितांचे फोटो ई-मोजणीच्या ‘व्हर्जन-२’वर अपलोड केले जाणार आहेत. त्यातील कोणी खोटी माहिती दिली असल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करणे सोयीचे होणार आहे.
सोलापूर शहरातील हद्दवाढ भागात गुंठेवारीची परवानगी बंद असल्याने नोटरीवर एकच जागा अनेकांना विकण्यात आल्या आहेत. त्या जागेची-जमिनीची मालकी सिद्ध करणारी कागदपत्रे व मोजणी नकाशा नसल्याने पुणे, सोलापूरसह अन्य शहरांमध्ये अशीच स्थिती आहे. जागेची किंवा जमिनीची मोजणी करुन गुंठेवारीला परवानगी मिळविण्यासाठी खोटी कागदपत्रे तयार करुन आणि खोट्या व्यक्ती उभ्या करुन प्रॉपर्टी हडपण्याचेही प्रकार घडत आहेत. पण, आता मोजणी करतानाच फसवणुकीचे प्रकार टळणार आहेत. भूमिअभिलेख विभागाने ई-मोजणीत आता व्हर्जन-२ आणले आहे. सुरवातीला सोलापूर जिल्ह्यात या पद्धतीने सांगोला तालुक्यातील मोजणी झाली. त्यानंतर मंगळवेढा, उत्तर सोलापूर व मोहोळमध्ये झाली. आता संपूर्ण जिल्ह्यासाठीच अशी पद्धत लागू करण्यात आली आहे.
ई-मोजणीचे ‘व्हर्जन-२’ म्हणजे काय?
जागेची किंवा जमिनीची मोजणी करताना मूळ मालकासह म्हणजेच अर्जदारासह शेजारील (चारही बाजूचे मूळ मालक) व्यक्तींनाही बोलावले जाईल. त्यांच्यासमोर त्या मालमत्तेची ई-मोजणी होईल. त्यावेळी भूमिअभिलेखच्या ई-मोजणी संकेतस्थळावर जीपीएस लोकेशेन, त्या जागा किंवा जमिनीचे गुगल ईमेज आणि उपस्थितांचे फोटो अपलोड केले जातात. मोजणीनंतर कोणालाही तो गट नंबर टाकून ते फोटो, नकाशा ऑनलाइन पाहाता येईल. मोजणीवेळी खोट्या व्यक्ती उभ्या करुन होणारी फसवणूक यातून टळणार असून, कोणी खोटी माहिती किंवा खोटे नाव सांगितले असल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करणेही सोयीचे होणार आहे.
फसवणूक केल्यास त्याची माहिती लगेच समजेल
मोजणीवेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ओळखीचे कोणी नसतात, त्यामुळे समोरील लोक चुकीची माहिती देवू शकतात. त्यामुळे आता मोजणीसंदर्भातील जबाब घेताना त्यावर स्वाक्षरी करणाऱ्याचे आधारकार्ड पाहिले जाईल. तर ई-मोजणीच्या ‘व्हर्जन-२’वर उपस्थितांचे फोटो, जागा-जमिनीचे गुगल इमेज, जीपीएस लोकेशन त्या वेबसाईटवर अपलोड केले जाणार आहे. जेणेकरुन कोणी फसवणूक करणार नाहीत, फसवणूक केल्यास त्याची माहिती लगेच समजेल.
- दादासाहेब घोडके, जिल्हा अधीक्षक, भूमिअभिलेख, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.