PM Narendra Modi sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! पंतप्रधान मोदी मे महिन्यात येणार सोलापुरात; विद्यापीठाने पाठविले पंतप्रधानांच्या सचिवांना पत्र; आता कोंडीपासून होणार थेट रस्ता, वाचा...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या हिरज रोडवरील ४८२ एकर परिसरातील प्रशासकीय इमारतीसमोर सुमारे १४.८२ कोटी रुपये खर्च करून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य २१ फुटी स्मारक उभारण्यात आले आहे. ३१ मे रोजी अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त स्मारकाचे लोकार्पण करण्याचे नियोजित आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या हिरज रोडवरील ४८२ एकर परिसरातील प्रशासकीय इमारतीसमोर सुमारे १४.८२ कोटी रुपये खर्च करून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य २१ फुटी स्मारक उभारण्यात आले आहे. ३१ मे रोजी अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त स्मारकाचे लोकार्पण करण्याचे नियोजित आहे. त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रणाचे पत्र पाठविले आहे.

राजमाता अहिल्यादेवींच्या स्मारकाच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान येतील, असे गृहीत धरून सध्या कामे सुरू आहेत. हिरज रोड ते नवीन प्रशासकीय इमारत हा रस्ता पूर्ण करण्यात आला आहे. आता सोलापूर-पुणे महामार्गावरील कोंडी येथील ब्रिजजवळून थेट विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीपर्यंत रस्ता तयार केला जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भूसंपादन अधिकारी सर्वेक्षण करतील. त्या रस्त्यासाठी खासगी किती जमीन संपादित करावी लागेल आणि वन विभागाची किती जमीन रस्त्यात येते, याची माहिती घेऊन राज्य शासनाला पाठविली जाणार आहे.

दरम्यान, विद्यापीठाच्या ४८२ एकर जागेत केंद्राच्या योजनेतून आणखी पाच इमारती बांधल्या जाणार असून पुढील चार दिवसांत त्याचे भूमिपूजन होणार असल्याचे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांनी सांगितले. त्यासाठी आता वन विभागाचा कोणताही अडथळा नसल्याचेही ते म्हणाले.

विद्यापीठाचे पंतप्रधानांच्या सचिवांना पत्र

विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. ३१ मे रोजी लोकार्पणाचा मोठा कार्यक्रम घेण्याचे नियोजन आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहावे, यासाठी विद्यापीठाचे प्रयत्न सुरू आहेत. त्याअनुषंगाने पंतप्रधानांची वेळ मिळावी म्हणून त्यांच्या सचिवांशी विद्यापीठ प्रशासनाने पत्रव्यवहार केला आहे.

- डॉ. अतुल लकडे, कुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

‘या’ नेत्यांच्या माध्यमातूनही प्रयत्न

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाच्या लोकार्पणासाठी पंतप्रधानांनी यावे, यासाठी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातूनही विद्यापीठ प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Army Success Story: कोकणच्या लेकीची जगभर चर्चा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे ठरल्या अमेरिकन सैन्यातील पहिल्या मराठी महिला; महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण

Latest Marathi News Update : पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते

39व्या वर्षीही मेस्सीचा चमत्कार! विश्वचषकात असा विक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच फुटबॉलपटू, रोनाल्डोलाही जमलं नाही ते मेस्सीने केलं

Chhatrapati Sambhajinagar: जि.प.च्या नव्या इमारतीला लोकार्पणापूर्वीच गेले तडे; ठेकेदाराचे देयक रोखून दोषींवर कारवाईची मागणी

Srikant Shinde: हिंदुत्वाची विश्वासार्हता गमावली: देवदर्शनानंतर श्रीकांत शिंदेंचा राजकीय हल्लाबोल, खासदार ओमराजे निंबाळकरांसह शनिदर्शन

SCROLL FOR NEXT