ग्रामपंचायत sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! ग्रामपंचायतीत नोंद असलेल्या मालमत्तांवर आता पतीसोबत पत्नीचेही नाव, जाणून घ्या कारण

पतीने परस्पर जागा विकू नये, कर्ज घेताना माहिती व्हावे, परस्पर घरजागा विकून बेघर होऊ नये, तिलाही समान हक्क असावा, ग्रामपंचायतीची घरपट्टी भरण्यासाठी पत्नीही बचत करेल, त्यातून थकबाकी कमी होईल, या हेतूने आता जागेच्या उताऱ्यावर पतीच्या नावासमोर पत्नीचे नाव नोंदवले जात आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : पतीने परस्पर घरजागा विक्री करू नये, जागेवर कर्ज घेताना पत्नीला माहिती व्हावे, परस्पर घरजागा विकून बेघर होऊ नये, घरजागेत तिलाही समान हक्क असावा आणि ग्रामपंचायतीची घरपट्टी भरण्यासाठी पत्नीही बचत करेल, त्यातून ग्रामपंचायतींची थकबाकी कमी होईल, या हेतूने आता घरजागेच्या उताऱ्यावर पतीच्या नावासमोरच पत्नीचे नाव नोंदविले जात आहे. त्यासाठी शासनाच्या २००८ च्या निर्णयाचा आधार घेतला जात आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला मालमत्ता करापोटी ४१ कोटी रुपये अपेक्षित आहेत. तर पाणी पट्टीतून २२ कोटी रुपये मिळतात. अनेकदा घरोघरी जावून कर भरण्याचे आवाहन ग्रामपंचायतींकडून मालमत्ताधारकांना करण्यात आले.

घरजागेच्या उताऱ्यावर पतीबरोबरच पत्नीचे नाव देखील नोंदविल्याने टॅक्स भरण्यासाठी महिलांचीच मोठी मदत केल्याचा अनुभव बहुतेक ग्रामपंचायतींना आल्याची वस्तुस्थिती आहे. सांगोला, बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर व माळशिरस या तालुक्यातील ग्रामपंचायतींकडे मालमत्ता कर व पाणी पट्टीतून अंदाजे १४ कोटी २३ लाख रुपये जमा होतात. उर्वरित मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, करमाळा, माढा व मंगळवेढा या तालुक्यातील ग्रामपंचायतीचेही उत्पन्न २५ कोटींचे आहे.

पत्नीचेही नाव आता उताऱ्यावर लावले गेल्याने २०२२-२३ मध्ये मालमत्ता करातून ३९ कोटी ३९ लाखांपर्यंत (९२.३९ टक्के) जमा झाली आहे. दुसरीकडे पाणी पट्टीतून २० कोटी ६७ लाख रुपये (९२.५९ टक्के) मिळाले आहेत. मागील दोन वर्षांत हा बदल घरजागेच्या उताऱ्यावर म्हणजेच ग्रामपंचायतींकडील मालमत्तांवर पतीसोबतच पत्नीचे नाव नोंदविल्याने झाल्याचे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाद्दिन शेळकंदे यांनी दिली.

सर्वच ग्रामपंचायतींना दिले आदेश

घरजागेत तथा ग्रामपंचायतींकडील नोंदणीकृत मालमत्तेत पतीसोबतच पत्नीलाही समान अधिकार मिळावा, घरपट्टी वसुलीत ग्रामपंचायतींना महिलांची मदत होईल, या उद्देशाने २००८ च्या शासन निर्णयाप्रमाणे पतीसोबतच त्याच्या पत्नींची नावे नोंदविण्यात आली आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीकडील सर्वच मालमत्तांवर पत्नीचे नाव नोंदवावे, अशा सूचना केल्या आहेत.

- इशाद्दिन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जिल्हा परिषद, सोलापूर

सोलापूर जिल्ह्याची सद्य:स्थिती

  • एकूण ग्रामपंचायती

  • १०१९

  • अंदाजे एकूण मालमत्ता

  • १० लाखांवर

  • अपेक्षित उत्पन्न

  • ६३ कोटी

  • प्रत्यक्षातील वसुली

  • ५३.६२ कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT