solapur dcc bank
solapur
तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसाठी १७०० पदास मान्यता आहे. मात्र, सध्या त्यातील तब्बल ८०० जागा रिक्त आहेत. राज्य शासनाने जिल्हा मध्यवर्ती बॅंकांच्या पदभरतीची नियमावली प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार पदभरतीत स्थानिक उमेदवारांसाठी ७० टक्के जागा असणार आहेत. बॅंकेला पदभरतीस मान्यता मिळालेली नाही, पण ‘आरबीआय’च्या निकषांची पूर्तता झाल्यावर बॅंकेत मोठी पदभरती होऊ शकते, असे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.
बॅंकेच्या ठेवीत वाढ करणे, सोने तारण कर्ज, वैयक्तिक कर्जवाटप, शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारी बॅंकेत व्हाव्यात, वीजबिले बॅंकेच्या माध्यमातून भरली जावीत, मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून कर्जवाटप, शेती कर्जवाटप आणि थकबाकी वसुली, अशा कामांसाठी बॅंकेला कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. सध्या बॅंकेकडे ९०० कर्मचारी आहेत, त्यांच्या माध्यमातून बॅंकेचा व्यवसाय दहा हजार कोटींपर्यंतच पोचला आहे. रिक्त पदांची भरती झाल्यास हा व्यवसाय आणखी पाच-सहा हजार कोटींनी वाढू शकतो, असा विश्वास बॅंकेला आहे.
बॅंकेने पदभरतीस अद्याप मान्यता मागितलेली नाही, पण त्यासंदर्भातील निर्णय ऑक्टोबर महिन्यात होऊ शकतो. सध्या प्रशासकास सहकार आयुक्तांनी सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर संचालक मंडळाची निवडणूक होणार की नाही, याबद्दल सहकार विभागातील वरिष्ठ अधिकारी देखील स्पष्टपणे सांगत नाहीत. मात्र, त्याचा संपूर्ण निर्णय सहकारमंत्र्यांवर अवलंबून असणार आहे. संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतरच पदभरती होईल, असेही बॅंकेचे अधिकारी सांगतात.
बॅंकेतील पदभरती ऑनलाईन पद्धतीनेच
अडचणीतील जिल्हा बॅंकांमधील पदभरतीसाठी ‘आरबीआय’ने काही आर्थिक निर्बंध घातले आहेत. बॅंकेने सहकार आयुक्तांकडून सुधारित सेवकसंच मंजूर करुन पदभरतीस ‘आरबीआय’ची मान्यता घेणे बंधनकारक आहे. बॅंकेच्या पदभरतीस मान्यता देण्यापूर्वी ‘आरबीआय’चे अधिकारी दोन दिवस बॅंकेत येऊन आर्थिक बाबी (आर्थिक सद्य:स्थिती, उत्पन्न व खर्च) पडताळल्या जातात. सर्वकाही ठिक असल्यास ‘आरबीआय’कडून पदभरतीस मान्यता मिळते. पदभरती पूर्णत: ऑनलाईन राबविणे आवश्यक आहे. त्यात एकूण रिक्तपदांच्या ७० टक्के पदे स्थानिक उमेदवारांसाठी तर उर्वरित ३० टक्के जागा बाहेरील जिल्ह्यातील उमेदवारांसाठी ठेवाव्या असतील, अशी माहिती राज्य बॅंकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली.
सोलापूर ‘डीसीसी’ची सद्य:स्थिती
एकूण शाखा
२१७
मंजूर अधिकारी-कर्मचारी
१७००
कार्यरत कर्मचारी
९००
कर्मचाऱ्यांची रिक्त पदे
८००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.