lach sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील नांदणी तपासणी नाक्यावर लाच घेणारा आरटीओ निरीक्षक व खासगी व्यक्ती रंगेहाथ सापडला, ड्रॉव्हरमध्ये किती रुपये, वाचा...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील नांदणी चेकपोस्टवर अवजड वाहन सोडण्यासाठी तीन हजारांची लाच मागितली. तडजोडीअंती अडीच हजार रुपये घेणाऱ्या वाहतूक निरीक्षकासह खागसी व्यक्तीला जालन्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. तानाजी शिवाजी धुमाळ व अमोल आप्पासाहेब पाटील या दोघांना अटक करण्यात आले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील नांदणी तपासणी नाक्यावरून (चेकपोस्ट) अवजड वाहन सोडण्यासाठी तीन हजारांची लाच मागितली. तडजोडीअंती अडीच हजार रुपये घेणाऱ्या वाहतूक निरीक्षकासह खागसी व्यक्तीला जालन्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. तानाजी शिवाजी धुमाळ व अमोल आप्पासाहेब पाटील या दोघांना अटक करण्यात आले आहे.

तक्रारदार मूळचा बार्शीचा असून त्याचे कंटेनर नेहमी गुजरात ते चेन्नई या मार्गावरून ये-जा करतात. नांदणी तपासणी नाक्यावरून तो पुढे मार्गस्थ करण्यासाठी पूर्वी दोन हजार रुपये घेतले जात होते. वाहन परत पास करण्यासाठी लाच मागितली जाते म्हणून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानुसार २५ डिसेंबर रोजी नोंदणी चेकपोस्टवर सापळा लावला. तक्रारदाराची गाडी पास करण्यासाठी परमीट घेऊन गेल्यावर वाहतूक निरीक्षक तानाजी धुमाळ यांच्या कार्यालयात गेल्यावर तेथील संशयित आरोपी खासगी व्यक्ती अमोल पाटील याने तीन हजार रुपये मागितले.

तडजोडीअंती अडीच हजार रुपये द्यायचे ठरले. ती रक्कम स्वीकारून धुमाळ यांच्यासमोरील टेबलाच्या ड्राव्हरमध्ये ठेवली. याचवेळी पोलिस उपअधीक्षक बाळू जाधवर यांच्या पथकाने त्याठिकाणी धाव घेत अंगझडती घेतली. त्यावेळी धुमाळकडे महागडा मोबाइल, स्मार्ट वॉच, ब्ल्युटूथ तर खासगी व्यक्तीकडे ११ हजार ८१० रुपये, मोबाईल, दोन अंगठ्या, चेन आणि टेबलाच्या ड्राव्हरमध्ये २४ हजार ३९० रुपये मिळाले. दोघांविरुद्ध मंद्रुप पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘या’ पथकाने केली कारवाई

ही कारवाई उपअधीक्षक बाळू जाधवर यांच्या नेतृत्वात पोलिस अंमलदार गजानन घायवट, भालचंद्र बिनोरकर, गणेश चेके, संदीप लहाने, मनोहर भुतेकर, गजानन कांबळे, शिवलिंग खुळे, अमोल चेके यांच्या पथकाने पार पाडली. दरम्यान, धुमाळ यांच्या पुणे व लातूर येथील घरांची झडती तेथील पथकांकडून घेण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ७ महिलांचा जागीच मृत्यू; ४ गंभीर जखमी

NATO कागदी वाघ! रशियालाही माहितीय, आता अमेरिकेनं बाहेर पडलं पाहिजे; युद्धात एकटं पाडल्यानं ट्रम्प संतापले

Latest Marathi News Live Update : पैशांच्या वादातून मित्रानेच केला तरुणाचा खून

Property Tax : पिंपरी महापालिकेला ९४७ कोटींचे उत्पन्न; सव्वासहा लाख नागरिकांनी भरला मिळकतकर

Ambegaon Hailstorm Damage: आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात गारपीटीचा कहर; कांदा, गहू, हरबरा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT