ips m raj kumar

 

solapur

महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! रात्री 11 नंतर सोलापुरातील दुकाने राहणार बंद; रात्रगस्तीसाठी शहर गुन्हे शाखा, स्थानिक पोलिस अन्‌ ‘डीबी’ पथके; 6 जानेवारीपासून असणार ‘ही’ वेळ

सोलापूर शहरातील बहुतेक रस्त्यांलगत चायनीज, अंडाभुर्जी, वडापाव, भजीपाव, मच्छी फ्राय, चिकन-६५ असे हातगाडे पाहायला मिळतात. पान टपऱ्या, चहा कँटीन देखील रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. त्या ठिकाणी विनाकारण रात्रीच्या वेळी गर्दी दिसून येते. परवानगी नसताना देखील अनधिकृत हातगाडे रस्त्यांलगत दिसतात.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सध्या रस्त्यावरील खाद्यपदार्थांचे हातगाडे, चायनीज सेंटर, पान टपऱ्या रात्री अकरानंतर सुरू राहणार नाहीत. शहरात आता दररोज रात्री नऊ ते साडेअकरापर्यंत प्रत्येक पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, शहर गुन्हे शाखा, स्थानिक पोलिस व तेथील गुन्हे प्रकटीकरण पथकांची (डीबी पथके) गस्त सुरु आहे.

सोलापूर शहरातील बहुतेक रस्त्यांलगत चायनीज, अंडाभुर्जी, वडापाव, भजीपाव, मच्छी फ्राय, चिकन-६५ असे हातगाडे पाहायला मिळतात. पान टपऱ्या, चहा कँटीन देखील रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. त्या ठिकाणी विनाकारण रात्रीच्या वेळी गर्दी दिसून येते. परवानगी नसताना देखील अनधिकृत हातगाडे रस्त्यांलगत दिसतात. दुसरीकडे, शहरातील मोकळ्या मैदानांवर देखील मद्यपींची मैफल रंगलेली असते.

निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, याची दक्षता पोलिसांकडून घेतली जात आहे. शहरातील विजापूर नाका, एमआयडीसी, सदर बझार, फौजदार चावडी, जोडभावी पेठ, जेलरोड, सलगर वस्ती पोलिस ठाण्यातील डीबी पथक, पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांसमवेत स्थानिक पोलिसांचे पथक आणि शहर गुन्हे शाखेच्या साध्या वेशातील तीन पथकांची रात्री शहरात गस्त असणार आहे. दररोज एक पोलिस उपायुक्त रात्री १० ते ११ या वेळेत शहरातील स्थितीची पाहणी करत आहेत.

बंदोबस्ताचे नियोजन असे...

  • एकूण पथके : ११

  • एकूण अंमलदार : २०० हून अधिक

  • एकूण अधिकारी : २५

  • गस्तीची वेळ : रात्री ९ ते ११.३०

सर्वांनी नियमाचे पालन करावे

सध्या रात्री ११ वाजेपर्यंत हातगाडे, दुकाने सुरू राहतील. शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने दररोज शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त सुरू आहे. विनाकारण पाच किंवा त्याहून अधिक व्यक्ती एका ठिकाणी थांबू नयेत, असे आदेश आहेत. त्याचे सर्वांनी पालन करावे.

- एम. राज कुमार, पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

६ जानेवारीपासून रात्री दहानंतर दुकाने बंद

महापालिका निवडणूक शांततेत, निर्भयपणे पार पडावी, यासाठी शहर पोलिसांनी रात्रगस्त वाढविली आहे. या पार्श्वभूमीवर रात्री दहानंतर शहरातील रस्त्यांलगतचे हातगाडे, पानटपऱ्या, चहा कँटीन बंद राहतील. याची अंमलबजावणी ६ जानेवारीपासून होऊ शकते. तूर्तास पोलिसांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही, पण प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील स्थिती पाहून तो निर्णय घेतला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी त्यांची खाती इतर मंत्र्यांकडे सोपवली; मोठं कारण आलं समोर, पडद्यामागे नेमकं काय घडलं?

T20 WC, WI vs ZIM: ७ चौकार, ७ षटकार... वानखेडेवर हेटमायरचं वादळ; झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना झोडपत विंडीजसाठी रचला वर्ल्डरेकॉर्ड

IND vs SA: अरे बॉल दे ना... ! अहमदाबादमध्ये द. आफ्रिकेचा खेळाडू चाहत्यांवर भडकला; Video Viral

बेकायदा इमारत होणार भुईसपाट! उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाचा पवित्रा; नेमकं प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाचा भाजीपाला, फळबागांना फटका

SCROLL FOR NEXT