mseb sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! स्मार्ट मीटरमधून भविष्यात जेवढा रिचार्ज तेवढीच वीज; बिल थकल्यास सुरक्षा ठेवीतून वसुली, दररोज वीजेचा वापर किती? मोबाईलवर समजणार, वाचा...

वीजेची हानी तथा गळती, चोरी रोखण्यासाठी स्मार्ट मीटर ‘महावितरण’साठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास महावितरणच्या अधिकाऱ्यांना आहे. स्मार्ट मीटरमध्ये बरेच फिचर असून त्यात प्रिपेड रिचार्जचीही सुविधा आहे. त्यामुळे भविष्यात वीजबिलाच्या थकबाकीची कटकट बंद करण्यासाठी प्रिपेड रिचार्ज जेवढा, तेवढीच वीज मिळेल.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : वीजेची हानी तथा गळती, चोरी रोखण्यासाठी स्मार्ट मीटर ‘महावितरण’साठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास महावितरणच्या अधिकाऱ्यांना आहे. स्मार्ट मीटरमध्ये बरेच फिचर असून त्यात प्रिपेड रिचार्जचीही सुविधा आहे. त्यामुळे भविष्यात वीजबिलाच्या थकबाकीची कटकट बंद करण्यासाठी प्रिपेड रिचार्ज जेवढा, तेवढीच वीज मिळेल. दररोज कुटुंबासाठी किती वीज लागते, याची माहिती ग्राहकास महाविद्युत ॲपमधून त्याच्या मोबाईलवर पहाता येणार आहे. सोलापूर शहरातील सव्वादोन लाख ग्राहकांपैकी सुमारे ५० हजारापर्यंत ग्राहकांनी ते मीटर बसविले आहे.

स्मार्ट मीटर बसविले जाणार नाहीत, त्याची सक्ती केली जाणार नाही, असे स्पष्टीकरण देऊनही आता प्रत्येक वीजग्राहकांच्या घराघरांत स्मार्ट मीटर बसविले जात आहे. या मीटरमध्ये छेडछाड केल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात बसून समजणार आहे. त्या मीटरद्वारे ‘महाविद्युत’ ॲप डाऊनलोड केल्यास ग्राहकाने दररोज किंवा प्रत्येक तासाला किती वीज वापरली, हे त्यातून समजेल. याशिवाय प्रत्येक महिन्याला वीजग्राहकांच्या घरोघरी जाऊन मीटरचे रीडिंग घेण्याचा प्रकार कायमचा बंद होणार आहे.

कार्यालयात बसून अधिकाऱ्यांना प्रत्येक ग्राहकाचे रीडिंग समजणार आहे. यामुळे रीडिंगमधील मानवी हस्तक्षेप किंवा चुका टळतील आणि ग्राहकांना वीजबिल अचूक जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनीच स्मार्ट मीटर बसवावे, असे आवाहनही अधिकाऱ्यांनी केले आहे.

तक्रारी निवारणासाठी विशेष मेळाव्यांचे नियोजन

सोलापूर शहरात महावितरणचे दोन लाख २५ हजार वीजग्राहक आहेत. त्या सर्वांना स्मार्ट मीटर बसवावे लागणार असून सध्या ५० हजारापर्यंत ग्राहकांना मीटर बसविण्यात आले आहे. जेवढी वीज वापरली तेवढेच बिल येईल, अशी पारदर्शक यंत्रणा त्यात आहे. बिलासंदर्भातील तक्रारींवर लवकरच विशेष मेळावे घेण्याचे नियोजन सुरू आहे.

- राजकुमार पाटील, कार्यकारी अभियंता (महावितरण), सोलापूर शहर

...तर रहावे लागणार अंधारात

एखाद्या ग्राहकाने दोन वीजबिले भरलीच नाहीत, तर महावितरणकडे जमा असलेल्या त्या ग्राहकाच्या सुरक्षा ठेवीतून बिलाची रक्कम कपात केली जाणार आहे. पुढे तो ग्राहक पुन्हा थकबाकीत राहिला तर त्याला सुरक्षा ठेवीची रक्कम आणि त्या महिन्याचे वीजबिल भरल्याशिवाय वीज कनेक्शन जोडून मिळणार नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Dog Life Imprisonment : ऐकावं ते नवलच! आता उत्तर प्रदेशात कुत्र्यालाही होणार जन्मठेप; योगी सरकारचा नवा निर्णय

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Thane Traffic: घोडबंदर मार्गावर दिवसा 'या' वाहनांना नो एन्ट्री, एकनाथ शिंदे यांचे निर्देश जारी

OCD Explained: OCD म्हणजे फक्त स्वच्छतेशी संबंधित नाही! डॉक्टरांनी सांगितले ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसॉर्डरचे खरे स्वरूप

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT