solapur news

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! ...तर आई-वडिलांची प्रॉपर्टी मुलांना मिळत नाही; सांभाळ न करणाऱ्या मुलांना दिलेली प्रॉपर्टी ‘या’ कायद्याने पालकांना परत घेण्याचा अधिकार

पोटाला चिमटा घेऊन आयुष्यभर अपार कष्ट करून कमावलेली प्रॉपर्टी आई-वडील आपल्या मुलांच्या नावे करतात. मुलांची प्रगती हेच त्यांचे स्वप्न असते. पण, उतारवयात पालकांना एकटे टाकून ऐशोआरामात जगणाऱ्या मुलांना दिलेली प्रॉपर्टी पालकांना पुन्हा घेण्याचा अधिकार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : पोटाला चिमटा घेऊन आयुष्यभर अपार कष्ट करून कमावलेली प्रॉपर्टी आई-वडील आपल्या मुलांच्या नावे करतात. मुलांची प्रगती हेच त्यांचे स्वप्न असते. पण, उतारवयात पालकांना एकटे टाकून ऐशोआरामात जगणाऱ्या मुलांना दिलेली प्रॉपर्टी पालकांना पुन्हा घेण्याचा अधिकार आहे. वरिष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण कायद्यानुसार अनेक पालकांना मुलांना बक्षिसपत्राने दिलेली प्रॉपर्टी परत मिळाली आहे. अशा प्रसंगात पालकांच्या प्रॉपर्टीतील हिस्सा त्यांच्या मुलांना मिळत नाही.

आई किंवा वडिलाने त्यांची मालमत्ता बक्षिसपत्राने मुलांच्या नावे केली असेल तर त्यात आपल्या दैनंदिन गरजा त्याने पुरवाव्यात, देखभाल करावी, अशा अटी टाकणे आवश्यक आहे. भविष्यात जी मुले आपल्या आई-वडिलांना एकटे सोडून जातात आणि त्यांची काळजी घेत नाहीत, त्यावेळी ती प्रॉपर्टी पालकांना परत मिळविता येते. त्याचे अधिकार कायद्याने प्रांताधिकाऱ्यांना दिले आहेत. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना विधिज्ञांच्या सल्ल्याने दिवाणी न्यायालयात देखील न्याय मागता येते. प्रांताधिकारी किंवा न्यायालयाच्या निकालानुसार मुलांच्या नावावरील बक्षीसपत्र तत्काळ रद्द करून ती मालमत्ता मूळ मालकाच्या नावे (पालक) केली जाते.

वरिष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण कायदा काय सांगतो?

पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे पालनपोषण आणि कल्याण कायदा २००७ किंवा वरिष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ मधील कलम २३(१) नुसार ज्येष्ठांना संरक्षण देण्यात आले आहे. एखाद्या पालकांनी किंवा ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मुलाला किंवा कायदेशीर वारसाला भेट म्हणून मालमत्ता दिली असेल आणि त्या बदल्यात देखभाल करण्याची अट असेल तर मुलाने ती अट पूर्ण करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास भेट म्हणून दिलेली मालमत्ता रद्द करण्याची किंवा परत घेण्याची पालक मागणी करू शकतात. ही तरतूद पालकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार देते. जेव्हा त्यांची मुले त्यांची काळजी घेण्यास असमर्थ ठरतात किंवा दुर्लक्ष करतात, त्यावेळी हा कायदा त्यांना सन्मानाचे जीवन जगण्यास मदत करतो.

ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावी योग्य खबरदारी

ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या मुलांच्या नावे प्रॉपर्टीचे बक्षिसपत्र करताना खबरदारी घ्यावी. त्यांनी भविष्यात आपली देखभाल न केल्यास ती प्रॉपर्टी परत घेण्याचा अधिकार बक्षिसपत्रात राखून ठेवावा. पुढे उतारवयात मुले सांभाळत नसल्यास पालकांना मुलांच्या नावे केलेली प्रॉपर्टी सहजपणे परत घेता येईल.

- प्रदीपसिंग राजपूत, जिल्हा सरकारी वकील, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR संघाला पुन्हा मोठा धक्का! गंभीरचा लाडका पठ्ठ्या संपूर्ण हंगामातूनच झाला बाहेर

Why Leopard Enters Villages : काळजाचा ठोकाच चुकला! अंगणात भांडी घासताना पुढ्यातच उभा राहिला बिबट्या; त्याला बघून युवती पडली बेशुद्ध, साताऱ्यातील थरारक घटना

Latest Marathi News Live Update : भांडुप स्टेशन रोडवरील तीन दुकानांना भीषण आग, परिसरात धावपळ

Shivaji University : विद्यापीठ कॅम्पसमधील ‘भूजल’ धोक्यात; सांडपाणी जमिनीत मुरविणे घातक, अधिसभा सदस्यांची प्रशासनाविरोधात नाराजी

Pune Bengaluru Highway Accident : कापड दुकानात करत होता काम, घरी पत्नी होती गर्भवती..; नियतीनं म्हाकवेच्या सौरभला कसं हिरावून नेलं? पुणे-बंगळूर महामार्गावर काय घडलं?

SCROLL FOR NEXT