zp schools sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी सप्टेंबरमध्ये; शिक्षक गुंतले मतदार पुनरीक्षणात, अभ्यासक्रम शिकवून झालाच नाही; ‘एससीईआरटी’चे अधिकारी म्हणाले...

चालू शैक्षणिक वर्षातील प्रथम घटक चाचणी १८, १९ ऑगस्टपासून घेण्याचे नियोजन मुख्याध्यापक संघाने केले आहे. पण, अनेक शिक्षक मतदार पुनरीक्षण कार्यक्रमात (एसआयआर) गुंतल्याने त्यांचा अभ्यासक्रमच शिकवून पूर्ण झालेला नाही. त्यामुळे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेने पायाभूत चाचणीचे वेळापत्रकच शाळांना दिलेले नाही. त्यामुळे दरवर्षी ऑगस्टमध्ये होणारी प्रथम घटक चाचणी यंदा सप्टेंबरमध्ये होणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : चालू शैक्षणिक वर्षातील प्रथम घटक चाचणी १८, १९ ऑगस्टपासून घेण्याचे नियोजन मुख्याध्यापक संघाने केले आहे. पण, अनेक शिक्षक मतदार पुनरीक्षण कार्यक्रमात (एसआयआर) गुंतल्याने त्यांचा अभ्यासक्रमच शिकवून पूर्ण झालेला नाही. त्यामुळे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेने पायाभूत चाचणीचे वेळापत्रकच शाळांना दिलेले नाही. त्यामुळे दरवर्षी ऑगस्टमध्ये होणारी प्रथम घटक चाचणी यंदा सप्टेंबरमध्ये होणार आहे.

दरवर्षी विद्यार्थ्यांच्या प्रथम घटक चाचणी, प्रथम सत्र (‘पॅट’अंतर्गत संकलित चाचणी-१), द्वितीय घटक चाचणी (‘पॅट’अंतर्गत संकलित चाचणी-२) आणि द्वितीय सत्र अशा परीक्षा होतात. दरम्यान, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (एससीईआरटी) इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, इंग्रजी, गणित या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका दिल्या जातात.

दरम्यान, आता मुख्याध्यापक संघाने ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात प्रथम घटक चाचणी घेण्याचे नियोजन केले आहे. परंतु, ‘एससीईआरटी’कडून इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी कधी होणार, याचे वेळापत्रकच शाळांना मिळालेले नाही. यात मागील इयत्तेच्या अभ्यासक्रमावरील प्रश्न असतात. जुलैअखेर किंवा १५ ऑगस्टपूर्वी ही पायाभूत चाचणी होणे अपेक्षित आहे. पण, यंदा ‘एसआयआर’मुळे पायाभूत चाचणीचेच वेळापत्रक प्राप्त झाले नसल्याने प्रथम घटक चाचणी महिनाभर लांबणार आहे.

परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होईल

सध्या मतदार पुनरीक्षणाचे काम सुरू असून त्याची जबाबदारी ‘बीएलओ’ म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांवर आहे. त्यांना सहकार्य करण्यासाठी आणखी काही शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा अभ्यासक्रम अजून शिकवून पूर्ण झालेला नाही. त्यामुळे यंदाची प्रथम घटक चाचणी ऑगस्टअखेर किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे नियोजन आहे. तत्पूर्वी, सर्व शाळांमधील अध्यापनाची माहिती घेतली जाईल.

- तानाजी माने, अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ

‘पॅट’चे पेपर तयार, आढावा घेऊन परीक्षा

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (एससीईआरटी) ‘पॅट’अंतर्गत पायाभूत चाचणीचे पेपर तयार करून ठेवले आहेत. पण, शिक्षक ‘एसआयआर’च्या कामात गुंतल्याने चाचणीचे वेळापत्रक अजून जाहीर केलेले नाही. ‘एसआयआर’चे काम संपल्यानंतर अभ्यासक्रम किती शिकवून झाला आहे, सर्व मनुष्यबळ उपलब्ध आहे का, याचा आढावा शिक्षणाधिकाऱ्यांकून घेतला जाणार आहे. त्यानंतर ‘पॅट’अंतर्गत पायाभूत चाचणीचे वेळापत्रक दिले जाईल, असे ‘एससीईआरटी’कडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाहतूक पोलिसाची दुचाकीस्वाराला शिवीगाळ! ‘एसीपी’ म्हणाले, वाहतूक पोलिसांना दिले जाणार चांगले वागण्याचे धडे; सहायक पोलिस आयुक्तांची झाली आदलाबदली

Ragi Ghavan: ग्लूटेन-फ्री नाश्ता हवाय? मग ही नाचणीच्या घावणाची रेसिपी नक्की ट्राय करा

Horoscope: पैशांच्या बाबतीत नशीबवान असतात ‘या’ 5 राशी; कमाईसोबत पैसा टिकवण्यातही पुढे!

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

SCROLL FOR NEXT