zp schools sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! ३१ मेपूर्वी शिक्षकांच्या बदल्या अन्‌ जूनमध्ये शिक्षक भरती; सोलापूर झेडपी शाळांमधील २०० शिक्षक अतिरिक्त, १७० शिक्षकांची होणार भरती

सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७७५ शाळा आहेत. १५ मार्च २०२४ च्या संचमान्यतेच्या शासन निर्णयानुसार २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता झाली आहे. त्यात पटसंख्येअभावी सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सुमारे २०० शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७७५ शाळा आहेत. १५ मार्च २०२४ च्या संचमान्यतेच्या शासन निर्णयानुसार २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता झाली आहे. त्यात पटसंख्येअभावी सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सुमारे २०० शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्या सर्वांचे एप्रिलमध्ये तालुकास्तरावर समायोजन होणार आहे. तत्पूर्वी, अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची यादी प्रसिद्ध होणार आहे.

दरवर्षी शाळा सुरू झाल्यानंतर शैक्षणिक वर्षाच्या मध्यावधीत शिक्षकांच्या बदल्या होत होत्या. त्याचा परिणाम गुणवत्तेवर होत होता. त्यामुळे आता १५ जूनपूर्वीच जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. तत्पूर्वी, संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन होईल. पहिल्यांदा तालुकास्तरावर समायोजनाची प्रक्रिया पार पडेल. उर्वरित शिक्षकांचे जिल्हास्तरावर आणि पुन्हा विभागीय स्तरावर समायोजन होईल. त्यानंतर बदलीपात्र शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या होणार आहेत.

शेवटच्या टप्प्यात आंतरजिल्हा बदल्या होतील. त्यानंतर रिक्त राहिलेली शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. या वर्षी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये साधारणत: पाच हजारांपर्यंत शिक्षकांची भरती होईल, असे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यात सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील १७० शिक्षक असतील.

१४ जूनपूर्वी होईल सर्व कार्यवाही

गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्हा परिषदेच्या शाळांचा पट साडेतीन ते चार हजारांनी वाढला आहे. तरीपण, यंदाच्या संचमान्यतेनुसार पटसंख्येअभावी जिल्ह्यातील अंदाजे २०० शिक्षक अतिरिक्त होत आहेत. त्यांच्या समायोजनाची कार्यवाही पुढील महिन्यात होणार असून, तारीख घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे फाइल पाठविली आहे. त्यांच्याकडून तारीख मिळाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे तालुका स्तरावर समायोजन होईल.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

१७५ शिक्षकांची होणार भरती

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करूनही सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७७५ शाळांमध्ये शिक्षकांची सुमारे २५० पदे रिक्त राहतात. त्यातील ८० टक्के पदांची पवित्र पोर्टलद्वारे भरती १५ जूनपूर्वी होणार आहे. या भरतीतून सोलापूर जिल्हा परिषदेला अंदाजे १७५ शिक्षक मिळणार आहेत. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आणि बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शिक्षक भरतीची कार्यवाही सुरू होणार आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेची स्थिती

  • एकूण शाळा

  • २,७७५

  • एकूण पटसंख्या

  • १.८४ लाख

  • अतिरिक्त ठरलेले शिक्षक

  • २००

  • जिल्हाअंतर्गत बदलीपात्र शिक्षक

  • १५००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara IT Park : कोल्हापूर-साताऱ्यात आयटी पार्कचा मार्ग मोकळा, म्हसवड MIDC साठीही तब्बल 500 कोटी; मंत्री उदय सामंत यांचा मोठा निर्णय

Satara District bank Election : सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत मंत्री जयकुमार गोरेंच्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांचा सावध पवित्रा

Uday Samant : यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने राज्यात स्वतंत्र अनुवाद समिती स्थापन करणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

वरिष्ठ IAS अधिकारी बेपत्ता, मोबाईही बंद; शेवटचं लोकेशन बंगळुरु विमानतळावर

Nagpur News : नऊ दिवसांपासून नवजात बालिकेच्या शोधात फिरत होती महिला; मुलगी मेल्याने होती अस्वस्थ, रिक्षामधून उडी मारण्याचाही प्रयत्न

SCROLL FOR NEXT