Ladki Bahin Yojana  esakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! ‘या’ लाडक्या बहिणींचा कायमचा थांबणार लाभ; मेपासून पात्र महिलांनाच दरमहा १५०० रुपये, ‘या’ वेबसाईटवर पाहा तुमचे नाव, वाचा...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार प्रत्येक लाभार्थी महिलेची पडताळणी झाली आहे. पात्र लाडक्या बहिणींनाच दरमहा १० तारखेपूर्वी १५०० रुपये दिले जाणार आहेत. आता ३० एप्रिलपर्यंत ‘ई-केवायसी’तील त्रुटींच्या दुरुस्तीसाठी मुदत देण्यात आली आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार प्रत्येक लाभार्थी महिलेची पडताळणी झाली आहे. पात्र लाडक्या बहिणींनाच दरमहा १० तारखेपूर्वी १५०० रुपये दिले जाणार आहेत. आता ३० एप्रिलपर्यंत ‘ई-केवायसी’तील त्रुटींच्या दुरुस्तीसाठी मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर मे महिन्यापासून निकषांत अपात्र ठरलेल्या सर्व महिलांचा लाभ कायमचा बंद होईल, असे जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाकडून सांगण्यात आले.

विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात १८ वर्षांवरील महिला मतदारांची संख्या १८ लाख ७७ हजारांपर्यंत होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ११ लाख २१ हजार महिला लाभार्थी होत्या. योजनेच्या लाभासाठी २१ ते ६५ वर्षांतील महिलाच पात्र असताना देखील सोलापूर जिल्ह्यातील लाभार्थी महिलांची संख्या संशयास्पद होती. अशीच स्थिती राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात होती. विशेष बाब म्हणजे राज्यातील अडीच कोटी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये सुद्धा नाही, यावर प्रश्न उपस्थित झाला.

मात्र, जूनअखेर जाहीर झालेल्या योजनेचे अर्ज सप्टेंबरपर्यंत मागविण्यात आले आणि पुढे नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. त्यामुळे पडताळणी होऊ शकली नाही. त्यानंतर लाभार्थींची योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार पडताळणी करण्यात आली. त्यात अपात्र कोण ठरले, कोणाचा लाभ बंद झाला, याबाबत महिलांमध्ये संभ्रम आहे. मात्र, मे महिन्यात ज्यांना १५०० रुपये येणार नाहीत त्या महिला निकषांत अपात्र ठरल्या, असे समजावे लागेल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘या’ वेबसाइटवर शोधता येईल नाव

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना आपले नाव यादीत आहे की नाही, हे ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाइटवर लॉगिन करून पाहता येते. ‘अर्जदार लॉगिन’ या पर्यायावर क्लिक करून त्याठिकाणी मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकावा लागतो. ‘लाभार्थी यादी’ किंवा ‘अर्जाची स्थिती’ हा पर्याय निवडून त्याठिकाणी आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक टाकल्यावर आपले नाव त्या यादीत आहे की नाही, हे समजते.

महिला अपात्र ठरलेले प्रमुख निकष...

  • लाभार्थी महिलेच्या नावे किंवा कुटुंबाकडे चारचाकी वाहन

  • केंद्र व राज्याच्या वैयक्तिक योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला

  • २१ वर्षांपेक्षा कमी आणि ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिला

  • ई-केवायसी न केलेल्या आणि वार्षिक उत्पन्न अडीच लाखांवर असलेल्या महिला

योजनेची सोलापूरची सद्यःस्थिती

  • जिल्ह्यातील महिला मतदार : १८.७७ लाख

  • ‘लाडकी बहिणीच्या लाभार्थी : ११,२०,५६३

  • पडताळीत अंदाजे अपात्र : ३.५० लाख

  • ई-केवायसी चुकलेले : ९८,०२१

  • वयात अपात्र ठरलेल्या महिला : १८,८१२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: मोदी सरकारमधील कोणत्या मंत्र्याने सर्वात वाईट कामगिरी केली? ५ मंत्र्यांची यादी तयार; खुद्द पंतप्रधानांनीच घेतली बैठक

Latest Marathi News Live Update : फोंडा घाटातून वाहतुकीवरील निर्बंध दहा जूनपर्यंत कायम

UP Investment: UP ला मिळाला मानाचा “एग्जेम्प्लर अवॉर्ड”! ऑगस्टमध्ये सिंगापूर-जपान वारी; पाहा काय आहे मुख्यमंत्र्यांचा मेगा प्लॅन

Hypnotism in Kolhapur : आधी संमोहित केलं, मग तब्बल 30 तोळे दागिने घेऊन पसार झाले; कोल्हापुरात बंगाली कारागिरासोबत धक्कादायक प्रकार, नेमकं घडलं काय?

शुभमन गिलचा IPL 2026 मधील बेस्ट कॅच... शिवम दुबेला माघारी पाठवून फिरवली मॅच Video Viral

SCROLL FOR NEXT