Ladki Bahin Yojana

 

sakal 

महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! 2.50 लाखांवर उत्पन्न असलेल्या ‘लाडक्या बहिणी’ नाहीतच; ‘E-kyc’तून समजणार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न; ३१ डिसेंबरपर्यंत ‘ई-केवायसी’ची मुदत

राज्यातील दोन कोटी ५९ लाख लाडक्या बहिणींमध्ये सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख नऊ हजार महिला होत्या. पण, योजनेच्या निकषांनुसार झालेल्या पडताळणीत आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाखांवर महिलांचा लाभ बंद झाला आहे. आता वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असलेल्यांचा लाभ बंद होणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील दोन कोटी ५९ लाख लाडक्या बहिणींमध्ये सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख नऊ हजार महिला होत्या. पण, योजनेच्या निकषांनुसार झालेल्या पडताळणीत आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाखांवर महिलांचा लाभ बंद झाला आहे. आता वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असलेल्यांचा लाभ बंद होणार आहे. त्यासाठी प्रत्येक लाडक्या बहिणीला ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करावी लागणार आहे.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली. दोन महिन्यांतच राज्यातील अडीच कोटींहून अधिक महिलांनी योजनेसाठी अर्ज केले. त्यात सरकारी नोकरदार महिला, पुरुष, प्राप्तीकर भरणाऱ्या महिला, चारचाकी वाहने असलेल्या, २१ पेक्षा कमी व ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिला, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांनीही अर्ज केले. त्यांना सुरवातीला तीन-चार महिने लाभ मिळाला.

पण, त्यानंतर निकषांच्या आधारावर पडताळणी सुरू झाली आणि राज्यातील सुमारे ५२ लाखांहून अधिक महिला अपात्रतेच्या यादीत आल्या. त्यात सोलापूर जिल्ह्यातील दोन लाखांहून अधिक लाडक्या बहिणी आहेत. आता ‘ई-केवायसी’नंतर सर्व लाभार्थींची माहिती आयकर तथा प्राप्तीकर विभागाकडे दिली जाणार आहे. त्यानंतर योजनेच्या निकषांनुसार अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या सर्वच लाडक्या बहिणींचा लाभ कायमचा बंद होणार आहे.

‘ई-केवायसी’ला द्यावे लागतात १००-२०० रुपये

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांना ई-केवायसी करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ज्या महिलेचा पती मयत झाला आहे, त्यांना पतीचा मृत्यू दाखला तर ज्या अविवाहित तरुणीला वडील नाहीत, तिला वडिलांचा मृत्यू दाखला गावातील अंगणवाडी सेविकेकडे द्यावा लागणार आहे. त्यासोबत एक अर्ज देखील लाडक्या बहिणीला द्यावा लागणार आहे. ‘ई-केवायसी’साठी महा-ई-सेवा किंवा आपले सरकार सेवा केंद्रात १०० ते २०० रुपये द्यावे लागत आहेत.

‘ई-केवायसी’ मुदतीत करून घ्यावी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थींनी ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करून घ्यायची आहे. त्याशिवाय योजनेचा पुढील लाभ मिळणार नाही. योजनेच्या निकषांनुसार पात्र असलेल्या महिलांना योजनेचा लाभ कायमचा मिळणार आहे.

- रमेश काटकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

म्युच्युअल घोडदौड!

‘ऑर्डर गिव्हिंग इफेक्ट’ सुविधा

शारदा मोटार (शुक्रवारचा बंद भाव : रु. ९२३)

आजचे राशिभविष्य - 24th नोव्हेंबर 2025

१०५ तासांनंतर थांबली सोलापुरातील ‘इन्कम टॅक्स’ची चौकशी! रविवारी रात्री पंचनामा करून अधिकारी रवाना; आता माहिती अन्‌ कागदपत्रांची होणार पडताळणी

SCROLL FOR NEXT