Flood

 
esakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यातील पुराने वेढलेली ‘ही’ ४१ गावे आठ दिवस राहणार अंधारात; वीजेचे १५०० ट्रान्स्फॉर्मर गेले पुरात वाहून, चिखल कमी झाल्याव होणार दुरूस्ती

सीना नदीला आलेल्या पुरामुळे ‘महावितरण’च्या पाच सबस्टेशनमध्ये पाणी शिरले आहे. काही ठिकाणी सबस्टेशनला जाणारी विजेची लाइन पाण्याखाली गेली आहे. १३२९ ट्रान्स्फॉर्मरमध्ये पाणी असल्याने नदी काठावरील ४१ गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. आणखी आठ दिवस तेथील वीजपुरवठा बंदच राहणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सीना नदीला आलेल्या पुरामुळे ‘महावितरण’च्या पाच सबस्टेशनमध्ये पाणी शिरले आहे. काही ठिकाणी सबस्टेशनला जाणारी विजेची लाइन पाण्याखाली गेली आहे. १३२९ ट्रान्स्फॉर्मरमध्ये पाणी असल्याने नदी काठावरील ४१ गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. आणखी आठ दिवस तेथील वीजपुरवठा बंदच राहणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

करमाळ्यातील आवाटी, माढ्यातील कुंभेज, मोहोळ तालुक्यातील भांबेवाडी व लांबोटी आणि दक्षिण सोलापुरातील औराद या सबस्टेशनवरील लाइट सध्या बंद करण्यात आली आहे. याशिवाय वडकबाळ, नरखेड, तिऱ्हे, डोणगाव, तेलगाव व मलिकपेठ या गावातील वीज खंडित करण्यात आली आहे. पूरस्थिती ओसरल्यावर सबस्टेशन, ट्रान्स्फॉर्मरची स्थिती पडताळून पाहिली जाणार आहे. पूर ओसरला तरीही चिखलामुळे त्याठिकाणी वाहन किंवा कर्मचारी, जाऊ शकणार नाहीत. त्यानंतर दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरू होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुरामुळे ‘महावितरण’चे देखील दोन कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांनी बसविलेले ट्रान्स्फार्मर नादुरुस्त

जिल्ह्यात सीना नदीकाठावर फळबागा व उसाचे क्षेत्र ९३ हजार हेक्टरपर्यंत आहे. पाण्यासाठी शेतकऱ्यांनी नदीकाठी स्वत:हून पदरमोड करून ट्रान्स्फॉर्मर बसविले आहेत. पण, पुरामुळे शेतकऱ्यांचे ६० हून अधिक ट्रान्स्फॉर्मर वाहून गेले असून, दीड हजार ट्रान्स्फॉर्मरमध्ये पाणी शिरल्याने ते नादुरुस्त झाले आहेत. त्याची दुरुस्ती व नवे ट्रान्स्फॉर्मर सरकारच्या वतीने बसवून मिळावेत, अशी रास्त मागणी त्या शेतकऱ्यांची आहे.

‘या’ गावांमध्ये राहणार अंधार

  • आवाटी सबस्टेशन : नेर्ले, आवाटी, निमगाव, गावंधरे

  • भांबेवाडी सबस्टेशन : भांबेवाडी, अष्टे, खुनेश्वर, मलिकपेठ, हिंगणी

  • औराद सबस्टेशन : औराद, संजवाड

  • कुंभेज सबस्टेशन : कुंभेज, खैराव, वाकाव

  • लांबोटी सबस्टेशन : श्रीपूर, लांबोटी, अर्जुनसोंड, साबळेवाडी, सावळेश्वर, मुंढेवाडी, मोरवंची, रामहिंगणी

  • वडकबाळ सबस्टेशन : वडकबाळ, हत्तूर, वांगी, मनगोळी, राजूर, सिंदखेड, व्हनमूर्गी, संजवाड, बंदलगी

  • कोर्सेगाव सबस्टेशन : कोर्सेगाव, शेगाव, सुलेरजवळगे, उबांटे, कलकर्जाळ, नजीकचिंचोली, केगाव बुद्रूक व केगाव खुर्द

  • गुड्डेवाडी : गुड्डेवाडी, आळगी, अंकलगी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phaltan Politics:'फलटण पालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकणार'; राजे गट अन् शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांचा एकदिलाने लढवण्याचा निर्धार..

माेठी बातमी! 'फलटण तालुक्यातील दाेन केमिकल कंपन्यांना भीषण आग'; सव्वाआठ कोटींचे नुकसान, पळापळी अन् काय घडलं !

Latest Marathi News Live Update : मालेगावात अफवेमुळे गोंधळ! कोर्टात घुसण्याचा प्रयत्न, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली

Kagal crime News: शेतजमिनीच्या वादातून वृद्धाला आणि एका महिलेला मारहाण, या दोन परस्‍परविरोधी तक्रार कागल पोलिस ठाण्यात दाखल

Satara fraud:'कार विकून अनेकांना गंडा घालणाऱ्यांना अटक'; बनावट कागदपत्रांद्वारे सांगली, कोल्हापूर, निपाणी आदी ठिकाणी व्यवहार

SCROLL FOR NEXT