solapur crime sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! प्रवीण गायकवाड यांना धक्काबुक्की करणाऱ्या 10 पैकी दोघांवर खुनाचे गुन्हे; कलम वाढवून दोघांना अटक; 8 आरोपी अजूनही फरार, शोधासाठी पोलिसांची 3 पथके

प्रवीण गायकवाड यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलिसांनी दीपक काटे, किरण साळुंखे, भैय्या ढाणे, कृष्णा क्षीरसागर, अक्षय चव्हाण, बाबु बिहारी व भवानेश्वर शिरगिरे, अक्षय चव्हाण (सर्वजण रा. इंदापूर तालुका), अनिल माने (रा. मळोली, ता. माळशिरस) व रविंद्र उर्फ लल्या लेंगरे (रा. कुर्डुवाडी) या दहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. दाखल गुन्ह्यात चव्हाण, माने व लेंगरे यांची नावे पुन्हा समाविष्ठ करण्यात आली आहेत. यातील लेंगरे व काटे यांच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे शाई फासून धक्काबुक्की करण्यात आली होती. या प्रकरणी दहा जणांविरूद्ध अक्कलकोट उत्तर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. त्यात शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे व भवानेश्वर शिरगिरे यांना पोलिसांनी अटक करून आज (मंगळवारी) अक्कलकोट न्यायालयात आणले होते. न्यायाधीश एम. एम. कल्याणकर यांनी दोन्ही संशयितांना दोन दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली आहे.

अक्कलकोटमधील एका कार्यक्रमासाठी प्रवीण गायकवाड रविवारी (ता. १३) त्याठिकाणी आले होते. त्यावेळी संभाजी ब्रिगेडच्या नावापुढे छत्रपती नाव का लावत नाहीत, असा जाब विचारून दीपक ताटे याच्यासह अन्य काहींनी गायकवाड यांच्या तोंडाला शाई फासली. त्यानंतर वाहनातून जात असताना त्यांना बाहेर काढून पुन्हा शाई फासून धक्काबुक्की करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्यासह अंमलदार त्याठिकाणी पोचले. त्यांनी सर्वांना बाजूला सारून गायकवाड यांना बाजूला केले. या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दाखल झाल्यावर पोलिसांनी विविध कलमांनुसार संशयितांवर गुन्हा दाखल केला.

पण, त्या कलमांनुसार सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असल्याने संशयितांना अटक झाली नव्हती. मात्र, रविवारी दुपारपासून सोमवारपर्यंत संशयित दोघे पोलिसांच्याच ताब्यात होते. पोलिसांवर दबाव वाढल्यानंतर पोलिसांनी संशयितांविरूद्ध गंभीर दुखापत केल्याप्रकरणी कलम ११८(२) वाढवले आणि दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी ठोठावली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव तपास करीत आहेत.

गुन्हा दहा जणांवर, पण दोघेच अटकेत

प्रवीण गायकवाड यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलिसांनी दीपक काटे, किरण साळुंखे, भैय्या ढाणे, कृष्णा क्षीरसागर, अक्षय चव्हाण, बाबु बिहारी व भवानेश्वर शिरगिरे, अक्षय चव्हाण (सर्वजण रा. इंदापूर तालुका), अनिल माने (रा. मळोली, ता. माळशिरस) व रविंद्र उर्फ लल्या लेंगरे (रा. कुर्डुवाडी) या दहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. दाखल गुन्ह्यात चव्हाण, माने व लेंगरे यांची नावे पुन्हा समाविष्ठ करण्यात आली आहेत. यातील लेंगरे व काटे यांच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत. फरार संशयित घरी सापडले नसून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहेत. विधानसभेत हा विषय आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातल्याने पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime : जंगलातील गुन्हेगारांना पकडले जाते, पण ठेवायचे कुठे? कोल्हापूर वनसंरक्षणातील गंभीर उणीव उघड

शिव ठाकरेपाठोपाठ आणखी एका मराठी अभिनेत्याच्या घराला भीषण आग; थोडक्यात वाचला अभिनेता, व्हिडिओमधून दाखवली परिस्थिती

Latest Marathi News Live Update : अंधेरी पश्चिमेतील सॉरेंटो टॉवरमध्ये आग; नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले

Numerology : उशिरा का होईना पण यशस्वी होतातच 'या' तारखेला जन्मलेले लोक...नशिबात असतो अधिकारी बनण्याचा योग

Hormone Balance Tips: हार्मोन संतुलित ठेवायचे आहेत? सायली शिंदेचे खास योग व जीवनशैली टिप्स; दैनंदिन जीवनात कसे अमलात आणायचे पाहा

SCROLL FOR NEXT