गुटखा विक्री

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! गुटखा, मावा विकाल तर १० वर्षांपर्यंत शिक्षा; बंदीनंतरही सोलापूर जिल्ह्यात सापडला ८२ लाखांचा गुटखा: विक्रेत्यांवर आता ‘मकोका’चीही होणार कारवाई

आता महाराष्ट्रातील गुटखा विक्रेत्यांवर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत (मकोका) कारवाई संदर्भातील विचारणा विधी व न्याय विभागाकडे करण्यात आली आहे. याशिवाय सध्या भारतीय न्याय संहितेतील कलम १२३ नुसार इतरांना विष खाऊ घालण्याच्या कारणाखाली कारवाई होणार आहे. त्यात संबधितास दहा वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : राज्य सरकारने १९ जुलै २०१२ पासून गुटखा, मावा विक्रीवर बंदी घातली. तरीपण, कर्नाटकच्या सीमेवरील सोलापूर शहर-जिल्ह्यात दरवर्षी सरासरी दीड ते दोन कोटींचा गुटखा, मावा जप्त होतो. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील गुटखा विक्रेत्यांवर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत (मकोका) कारवाई संदर्भातील विचारणा विधी व न्याय विभागाकडे करण्यात आली आहे. याशिवाय सध्या भारतीय न्याय संहितेतील कलम १२३ नुसार इतरांना विष खाऊ घालण्याच्या कारणाखाली कारवाई होणार आहे. त्यात संबधितास दहा वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.

शाळा-महाविद्यालयापासून १०० मीटर अंतरात गुटखा, मावा, सुगंधित तंबाखू, सिगारेट अशा वस्तूंच्या विक्रीवर विशेष निर्बंध आहेत. मात्र, शहरी भागात कायदा पायदळी तुडविला जात असल्याची स्थिती आहे. दरम्यान, सोलापूरच्या अन्न व औषध प्रशासनाने १ जानेवारी ते १० नोव्हेंबरपर्यंत शहर-जिल्ह्यातून ८२ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. तरीपण, शहर-जिल्ह्यात किमान १५०० ठिकाणी गुटखा, मावा विक्री बिनधास्तपणे सुरु आहे.

या अवैध व्यवसायाची उलाढाल दररोज कोट्यवधीची आहे. आता अशा विक्रेत्यांवर ‘बीएनएस’मधील कलम १२३ नुसार व कलम ५९ नुसार कारवाई केली जाणार आहे. याशिवाय राज्य सरकारने विधी व न्याय विभागाला दिलेल्या प्रस्तावाअंतर्गत अशा विक्रेत्यांवर ‘मकोका’ची कारवाई करता येईल का, अशी विचारणा केली आहे. त्यामुळे गुटखा, मावा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

...तर कठोर कारवाई होईल

सात अन्नसुरक्षा अधिकारी व दोन सहायक आयुक्तांमार्फत सोलापूर शहर-जिल्ह्यातील गुटखा, मावा, सुगंधी तंबाखू अशा बंदीच्या पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई केली जाते. महाराष्ट्रात गुटखाबंदी आहे, पण शेजारील कर्नाटकात बंदी नसल्याने ते पदार्थ सोलापुरात चोरून आणली जातात. त्यावर विशेष लक्ष ठेवून कारवाया सुरु आहेत. गुटखा विक्री, साठा करणे, वाहतूक करणे, अशा लोकांवर भारतीय न्याय संहितेतील कलम १२३ प्रमाणे कारवाई केली जाते.

- सुनील जिंतुरकर, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, सोलापूर

‘या’ कलमांनुसार केली जाते कारवाई

महाराष्ट्रात १९ जुलै २०१२ पासून गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यातील कलम ५९ नुसार ६ महिने ते ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होते. दुसरीकडे भारतीय न्याय संहितेतील कलम १२३ नुसारदेखील दहा वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.

‘या’ वर्षातील कारवाई

  • एकूण गुटखा जप्त

  • ८१.८९ लाख रुपये

  • वाहने जप्त

  • १२

  • विक्रेत्यांवर दाखल गुन्हे

  • २७

  • कारवाईत जप्त एकूण मुद्देमाल

  • १.३२ कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; चार वेळा कार झाली पलटी, चालक जागीच ठार, गाडीचे दरवाजे कापून मृतदेह काढला बाहेर

Trimbakeshwar Land Acquisition : "कवडीमोल दरात जमिनी नकोत!" त्र्यंबकेश्वरच्या शेतकऱ्यांचा कुंभमेळा कामांना विरोध

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा नियोजन समितीची आज पहिली बैठक

Aquarius Mahayog: कुंभ राशीत तयार होतोय दुर्लभ महायोग! ‘या’ राशींसाठी धोक्याची घंटा? जाणून घ्या संपूर्ण भविष्य

Nagpur News: सीईओ साहेब, केवळ एक सही द्या हो! शेकडो दिव्यांग विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ; जी. आर.चा फटका

SCROLL FOR NEXT