mantralay sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! पूरग्रस्त शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबणार, शेतीकर्जाचे होणार पुनर्गठन? राज्यातील १६ लाख शेतकऱ्यांकडे ३४,००० कोटी थकबाकी

अतिवृष्टीमुळे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात खरीप हंगामातील सोलापूर जिल्ह्यातील पावणेतीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यातील ४६ महसूल मंडलांमधील पिके पाण्यात वाहून गेली आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडील शेतीकर्जाची वसुली थांबवून कर्जाचे पुनर्गठन करावे, अशी मागणी केली जात आहे. उद्या (बुधवार) सोलापूरच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या संदर्भात निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणार का? याकडे लक्ष लागले आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : अतिवृष्टीमुळे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात खरीप हंगामातील सोलापूर जिल्ह्यातील पावणेतीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यातील ४६ महसूल मंडलांमधील पिके पाण्यात वाहून गेली आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडील शेतीकर्जाची वसुली थांबवून कर्जाचे पुनर्गठन करावे, अशी मागणी केली जात आहे. उद्या (बुधवार) सोलापूरच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या संदर्भात निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणार का? याकडे लक्ष लागले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सुमारे चार लाख शेतकऱ्यांकडे २७०० कोटींची तर राज्यातील १६ लाख शेतकऱ्यांकडे ३४ हजार कोटींची थकबाकी आहे. त्यात पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे तर विदर्भ, मराठवाड्यातील जालना, बुलडाणा, परभणी, नांदेड, यवतमाळ, वर्धा, धाराशिव, धुळे, बीड, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अहिल्यानगर या जिल्ह्यांतील सर्वाधिक शेतकरी थकबाकीत आहेत. सध्या अतिवृष्टीमुळे उद्‌भवलेल्या पूरस्थितीचा सर्वाधिक फटका याच जिल्ह्यांना बसला आहे. पुरामुळे अनेक शेतकरी कुटुंबांना घर सोडून स्थंलातर करावे लागले आहे. काढणीला आलेले सोयाबीन, उडीद, मूग, कापूस, मका अशा पिकांचे नुकसान झाले आहे. पूरस्थितीमुळे खरीप पिके वाया गेली असून रब्बी पेरणीही लांबणीवर पडेल, अशी विदारक स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जवसुलीला स्थगिती देऊन शेतीकर्जाच्या पुनर्गठनाचा निर्णय होईल, अशी आशा आहे.

अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांसाठी सवलती...

  • शेती कर्जाच्या वसुलीला मिळते स्थगिती

  • शेतकऱ्यांकडील शेती कर्जाचे होते पुनर्गठन

  • विद्यार्थ्यांची होते परीक्षा व शैक्षणिक फी माफी

सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळेल, प्रशासनाला तातडीने पंचनामे करून अहवाल द्यायला सांगितले आहे. याशिवाय शेतकऱ्यांकडील बॅंकांच्या कर्जवसुलीसंदर्भातही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ठोस निर्णय घेता येईल.

- दत्तात्रय भरणे, कृषीमंत्री

जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका...

  • शेतकऱ्यांकडील थकबाकी

  • २,७०० कोटी

  • सर्वाधिक बाधित तालुके

  • अतिवृष्टी झालेली महसूल मंडळे

  • ४६

  • बाधित क्षेत्र

  • २.७९ लाख हेक्टर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs SL Live : पाकिस्तानचा विजय अन् श्रीलंकेचे पॅकअप! फायनलमध्ये IND vs PAK होऊ शकते मॅच... ; जाणून घ्या गणित

PAK vs SL Live : पाकिस्तानच्या अब्रार अहमदची 'मस्ती' त्याच्याच अंगलट आली, Wanindu Hasaranga ने बघा कशी लाज काढली Video Viral

Donald Trump: रशियाला निधी पुरवला; युक्रेन युद्धासाठी भारत-चीन जबाबदार, डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट आरोप

Mumbai News: शिंदे गटाच्या प्रचाराचा नारळ फुटणार! एकनाथ शिंदे मेळावा घेणार; कधी आणि कुठे? जाणून घ्या...

ST Bank Annual Report: छत्रपती शिवाजी महाराजांसोबत नथुराम गोडसेचा फोटो; एसटी बँकेच्या वार्षिक अहवालावरून नवा वाद उफाळला

SCROLL FOR NEXT