chandrashekhar bawankule esakal
महाराष्ट्र बातम्या

Chandrashekhar Bawankule : राज्यात येत्या काळात मोठे भूकंप होणार

पक्षाच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यावर मोठ्या नेत्यांचे पक्ष प्रवेश करून घेण्याची जबाबदारी टाकली आहे. जानेवारी महिना पक्ष प्रवेशासाठी दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पक्षाच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यावर मोठ्या नेत्यांचे पक्ष प्रवेश करून घेण्याची जबाबदारी टाकली आहे. जानेवारी महिना पक्ष प्रवेशासाठी दिला आहे. येत्या काळात मोठे भूकंप होणार आहेत, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

पुणे लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षाच्या ‘सुपर वॉरियर्स’ची बैठक बावनकुळे यांनी घेतली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार प्रकाश जावडेकर, महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, सचिव वर्षा डहाळे आदी उपस्थित होते.

‘गेल्या २५ वर्षात जे आमदार झाले, खासदार झाले, निवडणुकांमध्ये पडले असले तरीही अशा नेत्यांना पक्षामध्ये घेऊन त्यांना सक्रीय करा असे आदेश पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात अनेक मोठे पक्षप्रवेश होणार आहेत. भाजपचे तुम्ही कार्यकर्ते आहात, तुम्ही करतपण बाहेरचा कोणताही व्यक्ती येऊन तुमचा नेता होऊ नये? असे मला वाटते. त्यामुळे तुम्ही कामाला लागा.

प्रत्येक बूथची बैठक घेऊन, १००-१५० नागरिकांना बोलवून त्यांच्यासोबत मन की बात करा. गेल्या १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या योजनांची माहिती द्या. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळविण्यासाठी आपण सुपर वॉरियर्स ही संकल्पना रावबिली आहे. प्रत्येकाने आपले फॉलोवर्स वाढविण्यासाठी प्रयत्न करा,’ अले बावनकुळे यांनी बैठकीत सांगितले.

दरम्यान बावनुकुळे यांनी बैठकीत पुण्यातील कामाबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांची बाजू सावरून घेतली. ‘‘लोकापर्यंत पोहचण्यासाठी पुण्यातील कार्यकर्ते पूर्ण क्षमतेने काम करतील. पुढच्या वेळी तुम्हाला पुण्याबद्दल तक्रार करण्याची संधी देणार नाही. शहरातील कोणत्याही सुपर वॉरियर्सला बदलण्याची वेळ येणार नाही, असे पाटील यांनी प्रदेशाध्यक्षांना आश्‍वासन दिले.

तसेच ‘मकर संक्रांतीनिमित्ताने आपण एक लाख घरात तिळगुळ वडी, १ लाख घरात हळकी कुंकवाचे वाण आणि १ लाख महिलांना श्रीराम लिहिलेली साडी देणार आहोत. पक्ष वाढीसाठी काम करताना साधणांची कमी पडणार नाही.’, असेही पाटील म्हणाले.

आमदार कांबळेनी जे केले ते गंभीर

भापजपचे आमदास सुनील कांबळे यांनी एका पोलिस कर्मचाऱ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांला कानाखाली मारले. पोलिसाला मारल्याने याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. यासंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, ‘सुनील कांबळे यांनी काल जे काही केले ते गंभीर आहे. याची पोलिसचौकशी करतीलच, पण पक्ष म्हणूनही याची चौकशी केली जाईल. यामध्ये कांबळे यांचही म्हणने आम्ही ऐकून घेऊ.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Nashik : अशोक खरातसोबत नाशिकचा बडा नेता, अनिसकडून गंभीर आरोप

PSL 2026 : पाकिस्ताच्या मुश्ताक अहमदचा उद्धटपणा... Live TV वर इंग्लंडच्या खेळाडूची लाज काढायला गेला अन् मग... Video Viral

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरातची SIT कडून सलग १०व्या दिवशी चौकशी

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! युद्ध सुरू झाल्यापासून सोनं 17% कोसळलं; आजचा भाव किती?

Ashok Kharat Case : भोंदू खरात प्रकरणातील 'त्या' पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याने 65 जणांवर गुन्हा; तुमच्याही मोबाईलमध्ये 'ते' व्हिडिओ आहेत?

SCROLL FOR NEXT